शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

युवतींनी शिक्षणासोबत कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 17:14 IST

अकोला : आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्यासाठी युवक - युवतीनी शिक्षणासोबत विविध कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी रोजी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे करण्यात आले होते.या रोजगार मेळाव्यासाठी ६ स्थानिक व दोन बाहेरच्या अशा एकूण ८ कंपन्या आल्या होत्या. या कंपन्याच्या माध्यमातून ३०६ युवतींना रोजगार मिळणार आहे.

अकोला : महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास नोकरीचा लागतो , आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. तरीही आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्यासाठी युवक - युवतीनी शिक्षणासोबत विविध कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी रोजी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, राधादेवी गोयनका महिला महाविदयालयाचे प्राचार्य देवेंद्र व्यास, खंडेलवाल ज्वेलर्सचे नितीन खंडलेवाल, पॅडसन्स इंडस्ट्रीजच्या अपुर्वा पडगीलवार, आर. के.टेक्नॉलाजीच्या रेखा अरंविद देठे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक संचालक दत्ता ठाकरे, एल. आय. सी.चे शाखा व्यवस्थापक निखील देशपांडे, निर्माण स्कॅन्स प्रायव्हेट लिमीटेडचे गणेश देशमुख, ओझोनचे दिपक दानडे, आश्लेषा पॉवरचे अखिलेश बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ही चाळीशीच्या आत आहे. तसेच देशाची ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. स्त्री शक्तीला योग्य व्यासपिठ मिळाले तर देशाच्या विकासासाठी हि स्त्रीशक्ती कामी येवू शकते हा विचार करून देशाच्या बांधणीसाठी काम करीत असतांना स्त्रीयांनी शिक्षणासोबत कौशल्य निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. प्रशिक्षण घेतांना प्रशिक्षणाचा सर्व खर्च शासन करणार आहे. याचा लाभ युवतींनी घ्यावा असेही ते म्हणाले. मोबाईलचा वापर कमी करावा हे पथ्य पाळावे असे ते म्हणाले.८ कंपन्यांमध्ये मिळणार ३०६ युवतींना रोजगारया रोजगार मेळाव्यासाठी खंडेलवाल ज्वेलर्स, अश्लेषा पॉवर कंट्रोल, निर्माण स्कॅन्स , आर.के.टेक्नॉलाजी , ओझोन मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटल, एल. आय. सी. अशा एकूण ६ स्थानिक व धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद व रुबीकॉन फॉर्म्युुलेशन औरंगाबाद या दोन बाहेरच्या अशा एकूण ८ कंपन्या आल्या होत्या. या कंपन्याच्या माध्यमातून ३०६ युवतींना रोजगार मिळणार आहे. या मेळाव्याचा ५०० हून अधिक युवतीनी लाभ घेतला. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आर. डी. जी. महाविदयालयाच्या डॉ. उषा वानखडे व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अजय चव्हाणसह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरStudentविद्यार्थी