शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीना मिळणार नाही उपस्थिती भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 10:54 IST

Education Sector News शाळा ऑनलाईनच झाल्यात त्यामुळे यावर्षात विद्यार्थिंनीना उपस्थिती भत्ता देण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने घेतला आहे.

- राजेश शेगाेकार

अकाेला: दारिद्र्य रेषेखालील आणि अनुसूचित जाती , भटक्या जाती विमुक्त जाती प्रवर्गातील तसेच आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थिंनीची शाळांमधील उपस्थिती वाढावी यासाठी त्यांना उपस्थिती भत्ता दिला जात हाेता. मात्र यंदा काेराेनाच्या संकटामुळे शाळा ऑनलाईनच झाल्यात त्यामुळे यावर्षात विद्यार्थिंनीना उपस्थिती भत्ता देण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदर्भात २२ फेबुवारी राेजी परिपत्रक काढून सर्व शिक्षणाधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ प्रति दिवस एक रुपया एवढी कमी रक्कम असतानाही शासनाने उपस्थिती भत्ता नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.

आदिवासी क्षेत्रातील तसेच अनुसूचित जाती , भटक्या जाती विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थिंनीची शाळांमधील उपस्थिती अतिशय नगण्य असयाची या उपस्थितीबाबत नव्वदच्या दशकात शासनाने अभ्यास करून कारणांचा शाेध घेतला असता पालकांचे दारिद्र्य हे एक कारण समाेर आले हाेते. घरातील आर्थिक परिस्थितीला हातभार लागावा यासाठी शाळेऐवजी मुलींना राेजगारासाठी पाठविले जाते किंवा घरी तरी ठेवले जात असे समाेर आले. त्यामुळे ११९२ च्या शासन निर्णयानुसार अशा प्रवर्गातील मुलींना प्राेत्साहन मिळावे त्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी या करिता उपस्थिती भत्ता दिला जाऊ लागला. एक रुपया प्रति दिवस अर्थात २२० रुपये वर्ष असा उपस्थिती भत्ता हाेता. रक्कम नाममात्र असली तरी प्राेत्साहन देण्यासाठी ही याेजना सुरू करण्यात आली हाेती. मात्र सन २०२०.२१ या शैक्षणिक वर्षात काेराेनामुळे शाळा बंदच ठेवाव्या लागल्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे लागले. त्यामुळे उपस्थितीचा निकषच संपला. याच कारणाचा फायदा घेत शासनाने उपस्थिती भत्ता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्याचे शिक्षण संचालक द.गाे. जगताप यांनी २२ फेब्रुवारी राेजी पत्र काढून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी