प्रियकराच्या ओढीने छत्तीसगडची अल्पवयीन प्रेयसी आली अकोल्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:33 PM2018-07-27T14:33:24+5:302018-07-27T14:38:18+5:30

छत्तीसगड पोलिसांनी खदान पोलिसांच्या मदतीने प्रेयसीला बार्शीटाकळी येथून ताब्यात घेतले आणि तिला घेऊन छत्तीसगड पोलीस कुटुंबीयांसह राजनांदगाव येथे रवाना झाले.

Girl from Chhattisgarh come Akola to meet her lover | प्रियकराच्या ओढीने छत्तीसगडची अल्पवयीन प्रेयसी आली अकोल्यात 

प्रियकराच्या ओढीने छत्तीसगडची अल्पवयीन प्रेयसी आली अकोल्यात 

Next
ठळक मुद्देछत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील एक अल्पवयीन मुलगी भिन्न धर्मीय युवकाच्या प्रेमात पडली.एक दिवस घरी कोणालाही न सांगता, थेट अकोला गाठले आणि खोकेवाली चाळमध्ये राहणाºया प्रियकराची भेट घेतली. ही माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यावर त्यांनी, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अकोला : म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं. प्रेमाला वय नसतं. प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीला प्रेमाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. असंच एका अल्पवयीन प्रेयसीबाबत घडलं. अकोल्यातील युवकाच्या प्रेमात पडलेल्या अल्पवयीन प्रेयसीला त्याच्या ओढीने चक्क अकोल्यात ओढत आणलं. अखेर छत्तीसगड पोलिसांनी खदान पोलिसांच्या मदतीने प्रेयसीला बार्शीटाकळी येथून ताब्यात घेतले आणि तिला घेऊन छत्तीसगड पोलीस कुटुंबीयांसह राजनांदगाव येथे रवाना झाले.
छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील एक अल्पवयीन मुलगी भिन्न धर्मीय युवकाच्या प्रेमात पडली. दोघांनी सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. दोघांचेही सतत मोबाइल फोनवर बोलणे व्हायचे. अल्पवयीन प्रेयसी प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडाली. प्रियकराचा विरह तिला सहन होत नव्हता. अशातच तिने एक दिवस घरी कोणालाही न सांगता, थेट अकोला गाठले आणि खोकेवाली चाळमध्ये राहणाºया प्रियकराची भेट घेतली. मुलगी अल्पवयीन असल्याने, प्रियकर व त्याच्या कुटुंबीयांनी मुलीला राजनांदगाव येथे परत पाठवून दिले. परंतु, काही महिन्यातच प्रेयसी पुन्हा अकोल्यात येऊन धडकली. ही माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यावर त्यांनी, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. छत्तीसगड पोलीस गुरुवारी सकाळी मुलीच्या कुटुंबीयांसह अकोल्यात हजर झाले. सुरुवातीला छत्तीसगड पोलिसांनी खदान पोलिसांच्या मदतीने खदान परिसरात मुलीचा शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही. मुलगी ही प्रियकरासोबत बार्शीटाकळी येथे असल्याचे समजल्यावर खदान पोलिसांनी तिला तेथून ताब्यात घेतले आणि छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात दिले. छत्तीसगड पोलीस तिला घेऊन कुटुंबासह राजनांदगावकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Girl from Chhattisgarh come Akola to meet her lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.