शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

टेरका येथील जनरेटर, कार्यालय ‘सील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:07 IST

मानोरा तहसिलच्या पथकाने तहसिलदारांच्या नेतृत्वात टेरका येथील जनरेटर तसेच कार्यालयाला सील लावले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/मानोरा : मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) येथे विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आल्यानंतर, प्रशासकीय यंत्रणेने जलदगतीने तपासाची चक्रे फिरवित शनिवारी घटनास्थळाचा पंचनामा केला. रविवार हा सुटीचा दिवस असतानाही, मानोरा तहसिलच्या पथकाने तहसिलदारांच्या नेतृत्वात टेरका येथील जनरेटर तसेच कार्यालयाला सील लावले.जिल्हा खनिकर्म विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना मिळालेला नसताना, मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) येथे ३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाले आहे. शेतजमीन अकृषक नसताना तसेच खनिकर्म विभागाकडून परवाना मिळण्यापूर्वीच टेरका येथे मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू करण्यात आले. यासंदर्भात मानोरा तालुक्यातील हट्टी येथील पृथ्वीराज उल्हास राठोड यांनी मानोरा तहसिलदार तसेच जिल्हा खनिकर्म विभागाकडे तक्रार केली होती. परंतू, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३१ आॅगस्टच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. याची तडकाफडकी दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी योग्य ती चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश मानोरा तहसिलदारांना दिले. त्यानुसार ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत टेरका येथील घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, टेरका येथील घटनास्थळावरून गिट्टी व अन्य गौण खनिजाची रातोरात विल्हेवाट लावली जात असल्याच्या विश्वसनीय माहितीनुसार, रविवारी तपासाची चक्रे अधिक जलदगतीने फिरली. सुटीचा दिवस असतानाही तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने टेरका येथे भेट देऊन तेथील जनरेटर तसेच कार्यालय सील केले. आतापर्यंत किती ब्रास गौण खनिज उत्खनन झाले याची निश्चित माहिती काढण्यासाठी भूमि अभिलेख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी मोठ्या दंडाची कारवाई होणार असल्याचे संकेत तहसिलदार डॉ. चव्हाण यांनी दिले.(प्रतिनिधी)

टॅग्स :Manoraमानोराwashimवाशिम