शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बार्शीटाकळी तालुक्यातील वडगावात गॅस सिलिंडरचा भडका; अनर्थ टळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:52 IST

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील वडगावात ४ मार्चच्या रात्री एका घरात गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटरने पेट घेतला होता. या घटनेबाबत माहिती मिळताच पिंजर येथील संत गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या १० मिनिटात घटनास्थळी पोहोचून भडकलेली शेगडी, सिलिंडर व रेग्युलेटर विझवून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

ठळक मुद्देसंत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील वडगावात ४ मार्चच्या रात्री एका घरात गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटरने पेट घेतला होता. या घटनेबाबत माहिती मिळताच पिंजर येथील संत गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या १० मिनिटात घटनास्थळी पोहोचून भडकलेली शेगडी, सिलिंडर व रेग्युलेटर विझवून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वडगाव येथील विनोद सीताराम निलखन यांच्या घरातील गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटरने ७.३० वाजताच्या सुमारास भडका घेतला होता. या घटनेने वडगावात प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती कळताच पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन  शोध व बचाव पथकाचे प्रमुख  दीपक सदाफळे त्यांच्या सहकाºयांसह अवघ्या १० मिनिटात तेथे पोहोचले. त्यांनी जीव धोक्यात घालून घरातील पेटलेले गॅस सिलिंडर आग लागलेल्या  घरातून काढून सुरक्षितस्थळी नेऊन विझवले. गॅस कनेक्शनची प्रथम शेगडी विझवली. त्यानंतर पेटलेली नळी ओढून रेग्युलेटरसह पेटलेले सिलिंडर  उचलून गावाबाहेर मोकळ्या सुरक्षित जागेत नेऊन  ठेवले. तेथे पेटलेले रेग्युलेटर विझवून नंतर  सिलिंडर  सुरक्षितपणे  बंद केले. दीपक सदाफळे  यांच्या धाडसी रेस्क्यू आॅपरेशनमुळे  पुढील भीषण अनर्थ टळला, हे विशेष. या घटनेत पेटलेले गॅस  कनेक्शन हे विनोद निलखन यांच्या घराच्या आतील खोलीत होते. विशेष म्हणजे यावेळी घरातील देव्हाºयात दिवे  लागलेले होते. आग लागलेल्या  घराच्या आजूबाजूला  अंदाजे १०० मीटर क्षेत्रातील सर्व लोकांना आपापल्या  घरातील गॅस कनेक्शन बंद करून घेऊन सर्वांना सुरक्षितस्थळी तत्काळ जाण्याबाबत दीपक सदाफळे यांनी सांगितले. गावकºयांना आपापल्या घरातील महत्त्वपूर्ण  कागदपत्रे, दाग-दागिने, वाहन घेऊन लहान मुले, वयोवृद्ध  लोकांसह  बाजूच्या  मंदिरात सुरक्षितस्थळी जाण्यासाठी विनंती  केली. या गावात घराला घरे लागूनच होती. त्यामुळे आगीच्या संपर्कात येणारे साहित्य आणि आगीचे स्वरूप वाढविण्यास कारणीभूत  होणाºया सर्व  वस्तू आगीच्या संपर्कात येण्याच्या आधीच    दीपक सदाफळे, उल्हास आटेकर, गौरव जवके यांनी सुरक्षितस्थळी हलविल्या. 

संपूर्ण गावाने अनुभवला थरार!वडगावातील या गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटर पेटल्याने घडलेल्या घटनेचा थरार संपूर्ण गावाने अनुभवला. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तातडीने पोहोचून राबविलेल्या मोहिमेमुळे मोठी जीवित हानी व वित्त हानी  टळली, हे विशेष.

दोन तासांपर्यंत चालली रेस्क्यू मोहीम!या धाडसी कारवाईत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासोबत त्यांचे सहकारी उल्हास आटेकर, गौरव जवके यांनी ही धाडसी रेस्क्यू  मोहीम फत्ते केली. ही मोहीम दोन तासांपर्यंत चालली. 

टॅग्स :Barshitakliबार्शिटाकळीfireआग