आश्चर्य आहे, अवघ्या चाेवीस तासांत निर्माण झाली कचरा साठवणुकीची समस्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 10:17 AM2021-06-03T10:17:08+5:302021-06-03T10:20:48+5:30

Akola Municipal Corporation : कचरा साठवणुकीसाठी जागा शिल्लक नसल्याची काेल्हेकुई करीत कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांनी मनपासमाेर वाहनांच्या रांगा लावल्याचे बुधवारी दिसून आले.

Garbage storage problem erupted in Akola | आश्चर्य आहे, अवघ्या चाेवीस तासांत निर्माण झाली कचरा साठवणुकीची समस्या!

आश्चर्य आहे, अवघ्या चाेवीस तासांत निर्माण झाली कचरा साठवणुकीची समस्या!

Next
ठळक मुद्देकचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या मनपासमाेर रांगात महापालिकेने ४ काेटींपेक्षा अधिक किमतीचे देयक अदा केले.
ाेला : नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केला जाणारा कचरा केवळ एका बाजूला सारण्याचे काम करणारी पाेकलेन मशीन मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी बंद करण्याचा निर्णय घेताच सत्तापक्षातील पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. आयुक्तांच्या निर्णयाला अवघ्या चाेवीस तासांचा अवधी उलटत नाही ताेच डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा शिल्लक नसल्याची काेल्हेकुई करीत कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांनी मनपासमाेर वाहनांच्या रांगा लावल्याचे बुधवारी दिसून आले. मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच आयुक्त निमा अराेरा यांनी नियमबाह्य कामांना कदापि थारा दिला जाणार नसल्याचे सांगत पुढील वाटचाल स्पष्ट केली हाेती. मागील चार वर्षांपासून डम्पिंग ग्राउंडवर कचरा बाजूला सारण्याचे काम करणाऱ्या पाेकलेन मशीनच्या माेबदल्यात महापालिकेने ४ काेटींपेक्षा अधिक किमतीचे देयक अदा केले. अर्थात, मनपाच्या तिजाेरीची दिवसाढवळ्या लूट हाेत असल्याची बाब आयुक्त अराेरा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही मशीन बंद करून मनपाच्या मालकीची मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या सर्व बाबी महापालिकेच्या हिताच्या असल्या तरी त्याआडून दुकानदारी करणारे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून कचरा संकलन करणाऱ्या वाहनचालकांना हाताशी धरून बुधवारी डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याची ओरड करीत आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी धाव घेतली. मशीनमध्ये अचानक बिघाड? डम्पिंग ग्राउंडवरील एक पाेकलेन मशीन आयुक्तांनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परभणी येथील कंत्राटदाराच्या दुसऱ्या मशीनद्वारे कचरा बाजूला सारण्याचे काम सुरू करण्यात आले. दाेन दिवसांपूर्वी या पर्यायी मशीनमध्ये अचानक बिघाड झाल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम बंद पडले. हा दुग्धशर्करा याेग अचानक कसा जुळून आला, हे न समजण्याइतपत अकाेलेकर नक्कीच दूधखुळे नाहीत. पडद्यामागील सूत्रधार काेण? मागील काही दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या विलगीकरणाची जबाबदारी मे. परभणी अग्राेटेक प्रा. लि. कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीने कचऱ्याचे विलगीकरण केल्यानंतर त्याची पुढे कशी विल्हेवाट लावली, याबद्दल अनभिज्ञता असताना कंपनीच्या देयकासाठी कर्तव्यदक्षतेचा आव आणणाऱ्या एका स्थानिक अधिकाऱ्याने आयुक्तांकडे रेटा लावला. त्या देयकाला आयुक्तांनी बाजूला सारल्यानंतर अचानक कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे प्रशासनाला अस्थिर करणारा पडद्यामागील सूत्रधार काेण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Web Title: Garbage storage problem erupted in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.