नायगावात उभारणार कचरा निर्मूलन प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:36 AM2017-11-07T01:36:51+5:302017-11-07T01:37:20+5:30

अकोला : शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता,  साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नायगावमधील ‘डम् िपंग ग्राउंड’वरील एक एकर जागेवर कचरा निर्मूलन प्रकल्प  उभारण्यावर अखेर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले.

Garbage erosion project will be set up in Naiga! | नायगावात उभारणार कचरा निर्मूलन प्रकल्प!

नायगावात उभारणार कचरा निर्मूलन प्रकल्प!

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाची ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेला हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता,  साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नायगावमधील ‘डम् िपंग ग्राउंड’वरील एक एकर जागेवर कचरा निर्मूलन प्रकल्प  उभारण्यावर अखेर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले. तसा ठराव  सत्ताधारी भाजपाने मंजूर केला असून, आर्ट ऑफ लिव्हिंग संस् थेच्या माध्यमातून हा प्रकल्प महिनाभरात सुरू केला जाणार आहे. 
नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर  जागेवर ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यात आले. या ठिकाणी  साठवणूक होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे  कचर्‍याचे ढीग साचून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स् थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा  सपाटा लावल्यामुळे समस्येत भर पडली आहे. शहरातील कचरा  घेऊन जाणार्‍या मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे,  धमकाविण्यासह मारहाण करण्यापर्यंत अतिक्रमकांनी मजल  गाठली. एकूणच ही समस्या ध्यानात घेता नायगावातील ‘डम्पिंग  ग्राउंड’वरील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली  होती. कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा  प्रकल्प उभारण्यासाठी मनपाकडे अनेक खासगी कंपन्यांनी धाव  घेतली होती. परंतु कचरा निर्मूलनावर होणारा खर्च व ठोस तोडगा  निघत नसल्यामुळे मनपाने अशा कंपन्यांना नकार दिला. मध्यंतरी  बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने कमी खर्चात  कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याचा मानस  प्रशासनाकडे व्यक्त केला. 
मागील काही दिवसांपासून संस्थेने डम्पिंग ग्राउंडवर प्रायोगिक  तत्त्वावर कचरा निर्मूलनाची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचे  सकारात्मक परिणाम पाहून महापालिकेने संस्थेला एक एकर  जागेवर प्रकल्प उभारण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 

मनपा उचलणार खर्च!
नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवरील एक एकर जागेवर टिनाचे शेड,  विद्युत-पाणीपुरवठय़ाची व्यवस्था मनपाकडून केली जाणार आहे.  एक टन प्लास्टिक पिशव्यांमागे दोन हजार रुपये मनपाकडून अदा  केले जातील. यामुळे स्थानिक कचरा जमा करणार्‍यांना रोजगार  उपलब्ध होईल. उर्वरित कचर्‍याचे विलीगीकरण करून त्याचे  खत तयार केले जाणार आहे. 

कचर्‍याचा सर्वाधिक त्रास पावसाळ्य़ात होतो. घंटागाड्यांमुळे  शहरातून कचरा उचलण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर  प्रक्रिया करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला मंजुरी दिली.  येत्या दिवसांत प्रकल्प सुरू केला जाईल.
-अजय लहाने, आयुक्त मनपा

ल्ल शहरात कचर्‍याची समस्या बिकट झाली आहे. कचर्‍यावर  प्रक्रिया करणे हाच उपाय असल्यामुळे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’  संस्थेकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यानुसार ठराव मंजूर केला. 
-विजय अग्रवाल, महापौर

Web Title: Garbage erosion project will be set up in Naiga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.