शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधून पेट्रोल, डीझलची चोरी करणारी टोळी कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:05 IST

टँकरमधून पेट्रोल, डीझल चोरी करताना सहा जणांच्या टोळीला विशेष पोलीस पथकाने अटक केली.

अकोला: पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पोलीस पथकाने कोळंबी येथील रॉयल ढाब्यावर शनिवारी दुपारी छापा टाकून ६ लाख ६0 हजार रुपये किमतीच्या पेट्रोल, डीझलच्या साठ्यासह टँकरमधून पेट्रोल, डीझल चोरी करताना सहा जणांच्या टोळीला अटक केली. या टोळीला बोरगाव मंजू पोलिसांनी रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास रॉयल ढाब्यावर छापा टाकून ढाब्यामागे उभ्या असलेल्या एमएच ३0 एल ४२६८ क्रमांकाच्या टँकरमधून प्लास्टिक नळीच्या मदतीने पेट्रोल, डीझलची चोरी करणाऱ्या नदीम अहमद शेख (२२ रा. आकाशवाणीसमोर अकोला), मोहम्मद आबिद शेख करीम (१८ रा. बेगम मंजील खदान), गजानन वाल्मीक चक्रनारायण (३0 रा. दाळंबी), शेख मोहम्मद शेख इब्राहिम (१९ रा. बेगम मंजील खदान), सैयद आकिब सैयद अलीम (२५ रा. गंगा नगर वाशिम बायपास) आणि टँकर चालक गुलाम फरिद गुलाम फारूख (२९ रा. पोळा चौक) यांना अटक केली होती. पोलिसांनी या टोळीकडून ५ लाख रुपये किंमतीचे ९ केएल डीझल, १ लाख ६0 हजार रुपये किमतीचे ३ केएल पेट्रोलच्या साठ्यासह १५ लाख रुपये किमतीच्या टँकरसह एकूण २१ लाख ९१ हजार ३८0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. विशेष पोलीस पथकाने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात दिले. बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी