शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

फवारणीचे औषध चोरणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 18:13 IST

फवारणीचे द्रव्य चोरणाऱ्या टोळीतील चार चोरट्यांना अटक करण्यात अकोट पोलिसांना बुधवारी सकाळी यश आले.

अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पाचमोरी परिसरातील गोदामातून एका ट्रकमध्ये भरलेले फवारणीचे द्रव्य चोरणाऱ्या टोळीतील चार चोरट्यांना अटक करण्यात अकोट पोलिसांना बुधवारी सकाळी यश आले. या टोळीतील चोरट्यांकडून फवारणीच्या द्रव्यांसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पाचमोरी परिसरात असलेल्या गोदामातून एका ट्रकमध्ये फवारणीचे द्रव्य भरण्यात आले होते. हे द्रव्य बाहेर जिल्ह्यात देण्यात येत होते; मात्र तत्पूर्वी सदरच्या ट्रकचालकाने तो ट्रक सोळाशे प्लॉट येथील त्याच्या घरासमोर उभा केला आणि रात्री झोपी गेला. सकाळी उठून तो बाहेरगावी जाण्याच्या बेतात असतानाच रात्री उशिरा या ट्रकमधील फवारणीचे द्रव्य चोरट्यांनी पळविल्याचे त्याच्या निदर्शनास आले. याप्रकरणी ट्रकचालकाने अकोट फाइल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून फवारणीचे द्रव्य चोरी करणाºया चोरट्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, त्यांना मंगळवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सय्यद सादीक सय्यद मोहिमोद्दीन वय २६ वर्षे, अजरुद्दीन तमीजोद्दीन वय ३० वर्षे, शहबाज खान ऊर्फ शब्या सुलेमान खान वय २५ वर्षे, आकिब जहीर खान वय २८ वर्षे सर्व रा. अकोट फाइल यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अकोट फाइल पोलिसांनी या चारही चोरट्यांची चौकशी सुरू केली असता, त्यांनी ट्रकमधील फवारणीचे द्रव्य चोरल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या जवळून एक लाख ५० हजार रुपये किमतीचे फवारणीचे द्रव्य, एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शहर पोलीस उप-अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट फाइल पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम यांच्या निर्देशाने पीएसआय सुशिर, हरिचंद्र दाते, सुनील टोपकर, शेख असलम, संजय पांडे, छोटू पवार, राहुल चव्हाण, दिलीप इंगोले, श्याम आठवे यांनी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी