शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सोने विकण्याचा बनाव करून लुटणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:25 IST

कमी भावात सोने विकण्याचा बनाव करायचा, खरेदीदाराला पैसे घेऊन बोलवायचे आणि सोने खरेदीसाठी एखादा व्यक्ती पैसे घेऊन आल्यावर टोळीतील दोघांनी पैसे घ्यायचे आणि दोघा जणांनी पोलिसाच्या गणवेशात येऊन छापा घालण्याचे नाटक करायचे व त्या व्यक्तीकडील पैसे घेऊन पोबारा करायचा, असे नाट्य रचून अनेकांना लाखो रुपयांनी गंडा घालणार्‍या टोळीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी पहाटे अटक केली. 

ठळक मुद्देनाट्य रचून अनेकांना लाखो रुपयांनी गंडा घालणारी टोळीगंडा घालणार्‍या टोळीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी पहाटे अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कमी भावात सोने विकण्याचा बनाव करायचा, खरेदीदाराला पैसे घेऊन बोलवायचे आणि सोने खरेदीसाठी एखादा व्यक्ती पैसे घेऊन आल्यावर टोळीतील दोघांनी पैसे घ्यायचे आणि दोघा जणांनी पोलिसाच्या गणवेशात येऊन छापा घालण्याचे नाटक करायचे व त्या व्यक्तीकडील पैसे घेऊन पोबारा करायचा, असे नाट्य रचून अनेकांना लाखो रुपयांनी गंडा घालणार्‍या टोळीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी पहाटे अटक केली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना जिल्हय़ात कमी भावात सोने विकण्याचा बनाव करून लुटणारी टोळी जिल्हय़ात कार्यरत असल्याची माहिती मिळाली. विशेष पथकातील एका पोलीस कर्मचार्‍याने ग्राहक म्हणून टोळीचा म्होरक्या असलेल्या महादेव ज्ञानदेव मुर्तडकर (३३ रा. पिंजर) याला मोबाइलवरून संपर्क साधला आणि भुसावळ येथून बोलत असल्याचे सांगून सोने खरेदी करायचे आहे, असे सांगितले. त्यावर महादेव मुर्तडकर याने १३ हजार रुपये तोळा या भावाने अडीच किलो सोने अडीच लाख रुपयांमध्ये देण्याचे कबूल केले. त्यानुसार विशेष पोलीस पथकाने रेडवा येथे रविवारीच सापळा रचला. सुरुवातीला महादेव मुर्तडकर याने ग्राहक असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला २0 लाख रुपये घेऊन पिंजरला बोलावले; परंतु नंतर त्याने टाळाटाळ करीत भेटण्याचे ठिकाण बदलले. पोलीस कर्मचार्‍याने सातत्याने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून सोने देण्याचा आग्रह केला. त्यामुळे महादेवने ग्राहक बनलेल्या पोलीस कर्मचार्‍याला कारंजा-मूर्तिजापूर टी पॉइंटजवळ बोलावले. या ठिकाणी महादेव मुर्तडकरचा सहकारी गजानन पांडुरंग बुटे (रा. पिंजर) याने आगपेटीमध्ये असलेले सोन्याचे तीन शिक्क  दाखवले. आणखी असे काही सोन्याचे शिक्के असल्याचे त्याने सांगितले. काही वेळात लगेच या ठिकाणी टोळीतील दोन तोतये पोलीस कर्मचारी बनून मंगेश काशिराम राठोड व राजू अंबू राठोड (३६, रा. वडगाव) हे दोघे आले व पोलीस असल्याचे सांगत, विशेष पथकातील पोलीस कर्मचार्‍याला धाकदपट करू लागले. परिसरातच दबा धरून बसलेल्या विशेष पथकाच्या पोलीस कर्मचार्‍यांनी टोळीतील चौघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन दुचाकी व चार चाकू जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 

टॅग्स :Crimeगुन्हाAkola cityअकोला शहर