शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:12 IST

पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील सोपीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ तुलंगा येथील ३५ वर्षीय विवाहिता २३ डिसेंबर रोजी सायंकाळी उभी होती.

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री : गुंगीचे औषध देऊन ३५ वर्षीय विवाहितेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना पातूर तालुक्यातील बेलुरा शिवारात २३ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी १ जानेवारी रोजी रात्री उशिरा पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीस अटक केली.आरोपीस पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील सोपीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ तुलंगा येथील ३५ वर्षीय विवाहिता २३ डिसेंबर रोजी सायंकाळी उभी होती. यावेळी तेथे मोहम्मद हारुल शे. अकबर रा. वाडेगाव हा तेथे दुचाकीने आला. त्याने विवाहितेला दुचाकीने घरी सोडून देण्याच्या बहाण्याने नेले. तेथून बेलुरा शिवारात एक कार उभी होती. या कारमध्ये चार युवक आधीच बसलेले होते. तेथे गेल्यानंतर विवाहितेला मोहम्मद हारूल याने गुंगीचे औषध दिले. औषधामुळे बेशुद्ध झालेल्या विवाहितेवर पाचही जणांनी अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला तिच्या नातेवाइकांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेची प्रकृती सुधारल्यानंतर तिने १ जानेवारी चान्नी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.पीडितेच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भादंवीच्या कलम ३७६ डी,३६३,३२४,३४, कलमान्वये तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. कलमान्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी मोहम्मद हारुल शे. अकबर यास अटक केली आहे.त्याला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पुढील तपास बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके करीत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार