Gang rape on married woman in Karla village | कार्ला येथे विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार
कार्ला येथे विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार

हिवरखेड (अकोला) : येथून जवळच असलेल्या कार्ला बु. येथील ३५ वर्षीय विवाहित महिलेला घरातून बळजबरीने उचलून नेऊन तीच्यावर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मंगळवार, २६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. हिवरखेड पोलिसांनी बुधवारी पहाटे याप्रकरणी त्याच गावातील पाच जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पीडीतीने हिवरखेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री ती घरात असताना घरावर कोणीतरी दगड फेकला. काय झाले म्हणून पाहण्यासाठी घराबाहेर पडली असता, त्या ठिकाणी संतोष खंडेराव, विलास खंडेराव, नागोराव सपकाळ, शांताराम ससे, त्रिशरण खंडेराव दिसून आले. या पाचही जणांनी आपल्याला बळजबरीन उचलून नजीकच्या शेतात नेले व तेथे लैंगिक अत्याचार केला, असे पीडीतेने तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात पिडीतेने हिवरखेड पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडीतेच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम ३६३, ३७६ व ३४ ड अन्वये गुन्हा दाखल करून, गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाय. पी. उईके व गोपाल दातीर हे करीत आहेत.


Web Title: Gang rape on married woman in Karla village
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.