शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील प्रतिभावान खेळाडू निवडण्यासाठी गेल इंडिया स्टार महाराष्ट्र उपक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:13 IST

अकोला : महाराष्ट्रातील शाळांमध्ये असलेल्या प्रतिभावान खेळाडूंना हेरून त्यांची जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चाचणी घेऊन मैदानी क्रीडा प्रकारावर लक्ष करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएआर) अंतर्गत गॅस अँथॉरिटी ऑफ इंडिया लि.(गेल), अँग्लियन मेडल हिंट कंपनीच्या सहकार्याने गेल इंडिया स्टार महाराष्ट्र उपक्रम राबविल्या जाणार आहे. 

ठळक मुद्दे२0२0 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिकची तयारी ११ ते १७ वयोगटातील खेळाडूंची करणार निवड

नितीन गव्हाळेलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्रातील शाळांमध्ये असलेल्या प्रतिभावान खेळाडूंना हेरून त्यांची जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चाचणी घेऊन मैदानी क्रीडा प्रकारावर लक्ष करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएआर) अंतर्गत गॅस अँथॉरिटी ऑफ इंडिया लि.(गेल), अँग्लियन मेडल हिंट कंपनीच्या सहकार्याने गेल इंडिया स्टार महाराष्ट्र उपक्रम राबविल्या जाणार आहे. नॅशनल युवा को-ऑप. सोसायटी अंतर्गत आगामी २0२0 मध्ये टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिक खेळ डोळय़ांसमोर ठेवून गेल इंडिया स्टार महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शाळांमधील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करू शकणार्‍या ११ ते १७ या वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांची जिल्हा स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तरावर चाचणी घेऊन या प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या खेळाडूंच्या क्रीडा प्रशिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी मैदानी क्रीडा प्रकारातील १00 मी. २00 मी. आणि ४00 मी. धावणे प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. राज्यातील आठ ठिकाणी चाचणीगेल इंडिया स्टार महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळांमधील खेळाडूंची निवड करण्यासाठी राज्यातील आठ जिल्हय़ांमध्ये, मुंबई शहर, सांगली, बीड, नागपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक आदी ठिकाणी जिल्हा स्तर निवड चाचणी डिसेंबर २0१७ पूर्वी घेण्यात येणार आहे. तसेच राज्य स्तरावर निवड चाचणी ५ डिसेंबर २0१७ ते १५ जानेवारी २0१८ दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणार आहे. 

खेळाडू निवडीसाठी शिक्षणाधिकार्‍यांना पत्रशाळांमधील गुणवान खेळाडू निवडीसाठी शिक्षणाधिकार्‍यांना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सहसंचालकांनी पत्र पाठवून गेल स्टार इंडिया महाराष्ट्र उपक्रमासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक उपलब्ध करून द्यावेत आणि निवड चाचणीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडाAkola cityअकोला शहरSchoolशाळा