शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गायगाव पेट्रोल डेपोसाठी आलेल्या रेल्वे वॅगनमधून पेट्रोल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:57 IST

अकोला : गायगाव पेट्रोल डेपोसाठी पेट्रोल घेऊन आलेल्या रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करणाºया टोळीचा उरळ पोलिसांनी बुधवारी पहाटे पारस रेल्वे स्थानकावर पर्दाफाश केला.

ठळक मुद्देरेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करण्यात येत असल्याची माहिती उरळचे ठाणेदार सतीष पाटील यांना मिळाली. पेट्रोलने भरलेल्या प्रत्येकी ३० लिटरच्या ०४ कॅन व ५४ रिकाम्या कॅन, दोन पाईप असा एकूण ४ लाख ४३ हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकोला : गायगाव पेट्रोल डेपोसाठी पेट्रोल घेऊन आलेल्या रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करणाºया टोळीचा उरळ पोलिसांनी बुधवारी पहाटे पारस रेल्वे स्थानकावर पर्दाफाश केला. या टोळीचा गत अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरु होता. ठाणेदार सतीष पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई करीत पेट्रोल माफीयांना पळता भुई थोडी केली आहे. कारवाईमूळे पेट्रोल चोरणाºया टोळयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.बाळापूर तालुक्यातील पारस रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करण्यात येत असल्याची माहिती उरळचे ठाणेदार सतीष पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकासह पारस रेल्वे स्टेशन परिसर गाठून या ठिकाणी सापळा रचला, मंगळवारी रात्रीपासून या टोळीवर पाळत ठेवल्यानंतर टोळीतील सहा जन पेट्रोलच्या चोरीसाठी पुढे येताच त्यांना पेट्रोल चोरतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या टोळीतील साहेब खान समशेर खान (२७), सुधाकर भिकाजी रणवरे(४८), अक्षय प्रकाश आगरकर (२०), रुपेश रमेश भाकरे (१९), गणेश रामकृष्ण भाकरे (४३), शिवहरी प्रकाश भाकरे (२८) सर्व रा. गायगांव या सहा पेट्रोल चोरटयांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून काळ्या रंगाची एम एच ०१ एसी ०५३५ क्रमांकाची दोन लाख ५० हजार रुपयांची कार, कारमध्ये पेट्रोलने भरलेल्या ३० लिटरच्या प्लास्टिकच्या १२ कॅन, ३ रिकाम्या कॅन (किंमत ४० हजार ३२० रुपये) व लाल रंगाची सुमारे एक लाख रुपयांची एम एच ३० बी ०७३२ क्रमांकाची जीप व यामधील पेट्रोलने भरलेल्या प्रत्येकी ३० लिटरच्या ०४ कॅन व ५४ रिकाम्या कॅन, दोन पाईप असा एकूण ४ लाख ४३ हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती ठाणेदार सतिश पाटील यांनी भारत पेट्रोलियम गायगांवचे कार्यपालन अधिकारी गोविंदकुमार मुंदडा यांना दिली. मुंदडा यांनी साडेतीन वाजता घटनास्थळ गाठून उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. मात्र घटनास्थळावरून तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून उरळचे ठाणेदार सतीष पाटील त्यांचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा