शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागावर आता ‘जीएडी’चा वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:58 IST

महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ढेपाळलेला कारभार ताळ्य़ावर आणणारे उपायुक्त (विकास) समाधान सोळंके यांच्यावर मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुरेश सोळसे यांना निर्देश दिले आहेत. यापुढे ‘जीएडी’च्या माध्यमातून शिक्षण विभागाचा कारभार चालणार असल्याने शिक्षण विभागातील मनमानी बदल्या व पदोन्नती प्रक्रियेचा फास अधिकच घट्ट आवळला जाणार असल्याचे चित्र समोर आले आहे. 

ठळक मुद्देमनपा उपायुक्त सुरेश सोळसे यांच्याकडे दिली जबाबदारीशिक्षण विभागातील मनमानी बदल्या व पदोन्नती प्रक्रियेचा फास अधिकच घट्ट आवळला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ढेपाळलेला कारभार ताळ्य़ावर आणणारे उपायुक्त (विकास) समाधान सोळंके यांच्यावर मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुरेश सोळसे यांना निर्देश दिले आहेत. यापुढे ‘जीएडी’च्या माध्यमातून शिक्षण विभागाचा कारभार चालणार असल्याने शिक्षण विभागातील मनमानी बदल्या व पदोन्नती प्रक्रियेचा फास अधिकच घट्ट आवळला जाणार असल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांचे किस्से व भ्रष्ट कामकाजाची चर्चा मोठय़ा चवीने केली जाते. मनपा शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांचा कोणी वाली नसल्यामुळे शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी या विभागातील निष्क्रिय अधिकार्‍यांनी कधीही ठोस निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. बदल्यांच्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणार्‍या शिक्षक संघटनांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले. सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, औषधी, दिव्यांग विद्यार्थ्यांना अत्यावश्यक साहित्य वाटपातही अनियमितता करणार्‍या शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे निदर्शनास येताच महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी या विभागाला ताळ्य़ावर आणण्याचा निर्णय घेतला. यासाठी मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे जबाबदारी सोपवली. उपायुक्त सोळंके यांनीसुद्धा एकाच शाळेवर मागील १५ ते २0 वर्षांपासून ठाण मांडणार्‍या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतला. २0१५-१६ मध्ये ७८ शिक्षकांच्या बदल्या करीत शिक्षण विभागाच्या मुळावर घाव घातला. २0१७-१८ मधील चालू आर्थिक वर्षात दहा वर्षांपासून एकाच शाळेवर कार्यरत राहणार्‍या ७६ शिक्षकांची उचलबांगडी करीत शिक्षण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींना चाप लावला. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याची सबब पुढे करून मनपा शाळांचे समायोजन करण्याच्या विचित्र प्रकाराला आळा घालण्यासाठी आयुक्त अजय लहाने, उपायुक्त सोळंके यांनी ऑगस्ट महिन्यापासून मनपा शाळेत नर्सरी, केजी-१, केजी-२ चे वर्ग सुरू केले. त्यासाठी ३३ शाळांमध्ये ३३ शिक्षणसेविका व त्यांच्या मदतीला ३३ मदतनीस यांची भरती प्रक्रिया राबवली. शिक्षण विभागाला ताळ्य़ावर आणल्यानंतर उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया राबवून मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्याची अतिरिक्त जबाबदारी दिल्यामुळे  शिक्षण विभागाचे कामकाज मनपा उपायुक्त (साप्रवि) सुरेश सोळसे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे. 

शिक्षण विभागाचे कामकाज बर्‍यापैकी ताळ्य़ावर आले असले, तरी अद्यापही सुधारणेसाठी वाव आहे. या विभागाच्या कामकाजावर लक्ष असून, नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ‘जीएडी’कडे सोपवली आहे. -अजय लहाने, आयुक्त मनपा