शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडी, छुप्या युतीवर उमेदवारांचे भवितव्य!

By admin | Updated: February 16, 2017 22:19 IST

उमेदवार अस्वस्थ; प्रभाग रचनेमुळे होतेय दमछाक

अकोला, दि. १६-महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांमध्ये बैचेनी वाढत चालली आहे. प्रभाग पुनर्रचनेमुळे प्रभागाचे अफाट वाढलेले भौगोलिक क्षेत्रफळ, नवख्या मतदारांची वाढलेली संख्या पाहता, मतांचा जोगवा मागणार्‍या उमेदवारांनी आता तडजोडीच्या राजकारणासह छुप्या युतीसाठी चाली खेळणे सुरू केल्याचे चित्र आहे.महालिकेच्या २0 प्रभागांसाठी ८0 सदस्य निवडून जाणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडल्यानंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल झाले. त्याचे परिणाम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राजकीय घडामोडींवर झाल्याचे पाहावयास मिळाले. प्रमुख राजकीय पक्षांनी यंदा युती किंवा आघाडी न करता निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात रंगत येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. असे असताना प्रमुख राजकीय पक्षांना सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत, हे येथे उल्लेखनीय. राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय पॅनलद्वारे चार उमेदवार उभे केले आहेत. काही प्रभागांत एक किंवा दोन प्रवर्गातूनच उमेदवारांना तिकीट देण्यात आले. अर्थात, ज्या ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले नाहीत, अशा ठिकाणी संबंधित राजकीय पक्षासोबत तडजोड केली जाणार, हे निश्‍चित मानल्या जात आहे. काही मोजक्या प्रभागांमध्ये राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारलेल्या बंडखोरांनी पक्षाविरोधात रणशिंग फुंकले आहे. अशा अपक्ष उमेदवारांची संख्या कमी असली, तरी ज्या ठिकाणी पक्षाचे संपूर्ण पॅनल निघू शकते, असा पक्षाला विश्‍वास आहे, नेमक्या त्याच ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे पॅनलला धक्का लागण्याची दाट चिन्हं आहेत. याशिवाय युती किंवा आघाडी नसल्यामुळे काही उमेदवार स्वत:च्या पातळीवर छुप्या पद्धतीने इतर पक्षाच्या उमेदवारांसोबत हातमिळवणी करीत असल्याची माहिती आहे. मतविभागणीचा फटका बसणार!प्रमुख राजकीय पक्षांनी महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे मतविभागणी होणार, हे निश्‍चित आहे. निवडणुकीत एकमेकांना साथ देणार्‍या राजकीय पक्षाच्या उमेदवारांची यामुळे कोंडी झाली आहे. मतविभागणीचा फटका संबंधित उमेदवारांना बसणार असल्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे.