शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटलांसमोरच चव्हाट्यावर आली जिल्हा राष्ट्रवादीतील धुसफुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 16:31 IST

Jayant Patil News मुर्तीजापूरात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा राष्ट्रवादीमधील अंतर्गत  धुसफुस चव्हाट्यावर आली.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांमध्ये उघड उघड गटबाजी व नाराजीचे दर्शन झाले. श्रीधर कांबे यांनी शिवा मोहोड यांच्यावर घणाघाती टीका केली. श्रीधर कांबे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी झाली.

मुर्तीजापूर : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री मुर्तीजापूरात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली. परिवार संवाद दौऱ्यानिमित्त पार पडलेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उघड उघड गटबाजी व नाराजीचे दर्शन झाले. माजी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीधर कांबे यांनी जिल्हा नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त करुन शिवा मोहोड यांच्यावर घणाघाती टीका केली. जिल्ह्य़ातील युवक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून, जिल्हा अध्यक्ष मनमानी करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याच गोंधळात श्रीधर कांबे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी झाली. शहर अध्यक्ष राम कोरडे आणि महाराष्ट्र संघटन सचिव रवी राठी यांच्यात काही विषयावरून मतभेत असल्याचे उघड झाले. मूर्तिजापूर विधानसभा उमेदवार निवडून का आले नाहीत, यावर मंथन सुरू असताना रवी राठी यांनी विश्लेषण करताना तालुक्यातील जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांना डावलल्याचे सांगताच अध्यक्ष राम कोरडे यांनी आक्रमक होऊन आक्षेप नोंदविला. त्यावेळी जयंत पाटील यांनी त्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला. निवडणूकीच्या 'हिशेबावरुन' आतुन लागलेली ही आग काय रुप धारण करते हे महत्वाचे आहे. यावरुन स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस मधील नाराजी व गटबाजी निश्चित चव्हाटय़ावर आली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील