शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंदा १ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:31 IST

पहिली ते आठवीच्या १ लाख ४३ हजार ७८५ विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने शैक्षणिक सत्र २0२0-२१ वर्षाकरिता इयत्ता पहिली ते आठवीच्या १ लाख ४३ हजार ७८५ विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्याची पाठ्यपुस्तके शनिवारपासून तालुकानिहाय ठरविलेल्या केंद्रावर पाठविण्यात येणार असल्याची समग्र शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर लहाने यांनी दिली.कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता, २0२0-२१ वर्षाच्या शैक्षणिक सत्रास विलंबाने सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; परंतु परिस्थिती नियंत्रणात आली तर शैक्षणिक नियोजन तयार असायला हवे, या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा कधीपासून सुरू होतील, याची निश्चिती नसली तरी शैक्षणिक सत्राची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. शाळा सुरू होतील तेव्हा होतील; परंतु पुस्तके शाळांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि शाळा सुरू झाल्यावर पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडली पाहिजेत, असा शिक्षण विभागाचा उद्देश आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक सत्रात मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय पाठ्यपुस्तके पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. पुस्तके वितरणाचे काम पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गट समन्वयक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, विशेष शिक्षक आदींचे गट तयार करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करीत ७ तालुक्यांमध्ये पाठ्यपुस्तके शनिवारपासून केंद्रांवर पोहोचणार आहेत.समग्र शिक्षा अंतर्गत यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ८ लाख ३६ हजार मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांच्या मार्गदर्शनात नियोजन केले असून, १५ जूनपर्यंत शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचतील.- नंदकिशोर लहाने, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान. 

 

टॅग्स :SchoolशाळाAkolaअकोलाStudentविद्यार्थी