गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी माेफत टेली मेडिसीन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:18 AM2021-05-13T04:18:03+5:302021-05-13T04:18:03+5:30

अकाेला : ‘शिवरायांचा ठेवा, माेफत आराेग्य सेवा’ असे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या छत्रपती फाऊंडेशनने काेराेनाकाळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ...

Free telemedicine service for homelessness patients | गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी माेफत टेली मेडिसीन सेवा

गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी माेफत टेली मेडिसीन सेवा

Next

अकाेला : ‘शिवरायांचा ठेवा, माेफत आराेग्य सेवा’ असे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या छत्रपती फाऊंडेशनने काेराेनाकाळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी माेफत जेवणाची व्यवस्था केली असून आता आराेग्य सेवेतही पाऊल ठेवले आहे. अकाेला शहरासह जिल्हाभरात जे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत अशा रुग्णांसाठी माेफत टेली मेडिसीन सेवा सुरू केली असून रुग्णांना संपूर्ण मार्गदर्शन व औषधे माेफत पुरविली जात आहेत.

छत्रपती फाऊंडेशन या एकाच नावाभाेवती दातृत्वाचे अनेक हात एकवटले आहेत. काेराेनाबाधितांसह त्यांच्या नातेवाईकांना दाेन वेळ सात्विक जेवण पुरविण्यासाठी अकाेल्यातील छत्रपती फाऊंडेशन धावून आले आहे. या फाऊंडेशनकडून अन्नपूर्णा अमृत अभियानाच्या माध्यमातून दरराेज सकाळ-संध्याकाळ ३०० डबे माेफत पुरविले जात आहेत. छत्रपती फाऊंडेशन या एकाच नावाखाली ४० जणांची चमू कार्यरत आहे. अध्यक्ष, सचिव अशा लाैकिक अर्थाने या छत्रपती फाऊंडेशनमध्ये काेणीही कार्यरत नाही. याच संस्थेने आता डाॅ. विवेक देशपांडे यांच्या मार्गदर्शनात टेली मेडिसीन सुरू केले आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांनी ......या क्रमांकावर संपर्क केला तर त्यांना याेग्य मार्गदर्शन तसेच औषधे पुरविली जातात. या सेवेसाठी एक ब्रदर आणि सिस्टर नियुक्त केले असून ते संबधित रुग्णाची दिवसातून तीन वेळा विचारपूस करतात. तसेच सूचना देतात. हा उपक्रम आराेग्य यंत्रणेवरील ताण कमी करतानाच रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे.

बाॅक्स...

रुग्णवाहिकेसह बायपॅपही सेवेत

छत्रपती फाऊंडेशनच्यावतीने अकाेला शहरासाठी माेफत रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. ऑक्सिजन सुविधेसह ही रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहे. तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज जास्त भासते अशा रुग्णांसाठी बायपॅप ही तीन उपकरणे आणली असून आणखी सात उपकरणांची खरेदी फाऊंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही तीनही उपकरणे रुग्णांसाठी माेफत दिली जात आहेत.

Web Title: Free telemedicine service for homelessness patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.