दोनपेक्षा जास्त सदस्य असलेल्या मजूर कुटुंबांनाच मोफत हरभरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:10 AM2020-06-17T10:10:08+5:302020-06-17T10:10:20+5:30

दोनपेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या मजूर कुटुंबांनाच एक किलो मोफत हरभरा वितरीत करण्यात येत आहे.

Free gram for working families with more than two members! | दोनपेक्षा जास्त सदस्य असलेल्या मजूर कुटुंबांनाच मोफत हरभरा!

दोनपेक्षा जास्त सदस्य असलेल्या मजूर कुटुंबांनाच मोफत हरभरा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमिवर शिधापत्रिका नसलेल्या विस्थापित मजुरांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ आणि प्रतिकुटुंब एक किलो हरभरा इत्यादी मोफत धान्याचे वितरण जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये दोनपेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या मजूर कुटुंबांनाच एक किलो मोफत हरभरा वितरीत करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी शिधापत्रिका नसलेल्या विस्थापित मजुरांना प्रतिमहा प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ तसेच प्रतिमहा प्रतिकुटुंब एक किलो हरभरा मोफत वितरीत करण्याचा निर्णय शासनामार्फत १९ मे रोजी घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना मोफत धान्याचे वितरण रास्त भाव दुकानांमधून सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना प्रतिमहा प्रतिव्यक्ती पाच किलोप्रमाणे मोफत तांदूळ वितरीत करण्यात येत असून, दोनपेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या मजूर कुटुंबांनाच प्रतिकुटुंब एक किलो मोफत हरभरा वितरीत करण्यात येत आहे.
त्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या आणि कुटुंबात दोनपेक्षा कमी म्हणजेच एक असलेल्या विस्थापित मजुरांना मोफत हरभऱ्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.


जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या विस्थापित मजुरांना प्रतिमहा प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ व प्रतिकुटुंब एक किलो हरभरा मोफत वितरीत करण्यात येत आहे. त्यामध्ये कुटुंबात दोनपेक्षा अधिक व्यक्ती असलेल्या मजूर कुटुंबांना एक किलो हरभºयाचे वितरण करण्यात येत आहे.
-बी.यू.काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी.

 

Web Title: Free gram for working families with more than two members!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.