शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपनीच्या नावांवर बक्षीस योजना देणाऱ्या बोगस साईटचा सुळसुळाट   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 23:02 IST

नामांकित कंपनींच्या नावाखाली बक्षीस योजनांचे आमिष दाखविणा-या बोगस साईटचा सुळसुळाट झाला आहे. बक्षीस योजनांच्या मॅसेजचे जाळे व्हाट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून टाकण्याचे प्रयोग सुरू असून, यातून भविष्यात फसवणूक होण्याचे संकेत आहेत.

- संजय खांडेकर अकोला  - नामांकित कंपनींच्या नावाखाली बक्षीस योजनांचे आमिष दाखविणा-या बोगस साईटचा सुळसुळाट झाला आहे. बक्षीस योजनांच्या मॅसेजचे जाळे व्हाट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून टाकण्याचे प्रयोग सुरू असून, यातून भविष्यात फसवणूक होण्याचे संकेत आहेत.स्पोर्ट साहित्य निर्मितीच्या जागतिक दर्जाच्या एका कंपनीचा अमुक-टमुक वर्धापन दिन असून, त्या निमित्ताने कंपनी शंभर भाग्यवंत ग्राहकांना शूज भेट देणार आहे, असे आमिष दाखविणारे मॅसेज गेल्या दोन आठवड्यापूर्वी व्हाट्स अ‍ॅपवर व्हायरल झाले. व्हायरल मॅसेजमधील सूचनेनुसार प्रयोग केल्यानंतर ही फेक साईट असल्याचे समोर आले. या घटनेला काही दिवस होत नाही तोच दोन दिवसांपासून एका बहुचर्चित खासगी विमान कंपनीच्या नावाखाली तशाच प्रकारच्या बक्षीस योजनेचा मॅसेज व्हाट्स अ‍ॅपवर व्हायरल होत आहे. ज्याप्रमाणे स्पोर्ट साहित्याची साईट फेक निघाली त्याचप्रमाणे या विमान कंपनीची साईटही फेक निघाली आहे. जाळ््यात ओढण्यासाठी विदेशातील लाभार्थ्यांच्या बनावट लालची कॉमेंटसही येथे टाकलेल्या असतात. त्यामुळे क्लीक करताच हजारो मोबाइल क्रमांकांचा डेटा अज्ञात साईटवर नोंदविला जातो. ज्याचा कुणाशी परिचयदेखील नाही. गोळा झालेल्या डेटाचा कोठे वापर तर होत नसेल ना, अशी शंका उपस्थित होते. सायबर क्राइमचा कारोभार पाहणाºया गुन्हे शाखेच्या अधिकाºयांसाठी हा विषय संशोधनाचा ठरतो आहे.बॉक्स *असे ठगविल्या जाते....व्हाट्स अ‍ॅपवर बक्षीस योजनेचा मॅसेज येऊन पडतो. या मॅसेजच्या माध्यमातून कंपनीची एक लिंक दिली जाते. क्लीक करताच संबंधित साईट उघडली जाते. नंतर साईटवर काही प्रश्न विचारून जुजबी माहिती टिपली जाते. त्यानंतर भाग्यवंत घोषित करून तुमचे मत मागितले जाते. एवढे सारे झाल्यानंतर सदर आमिषचा मॅसेज १० ते २० व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर किंवा व्यक्तींना पाठविण्याची सूचना दिली जाते. म्हणजे तुमच्यासह आणखी १०-२० जण त्यामध्ये जोडले जातात आणि एकाच वेळी हजारो मोबाइल क्रमांकाची माहिती अज्ञात असलेल्या साईटवर नोंद होते. साईटवरील सूचनेचे पालन केल्यानंतर शूजची साईज, विमान प्रवासाची तारीख टाकण्याच्या सूचना दिल्या जातात आणि पुढे अचानक ही साईट निकामी (बंद) होते.

टॅग्स :fraudधोकेबाजीAkolaअकोला