शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपनीच्या नावाखाली लुटणारी टोळी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 14:01 IST

अकोला: मोठ्या आणि नामांकित कंपनीच्या नावाखाली सामान्य ग्राहकांना लुटणारी टोळी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर सक्रिय असून, यातून अनेकांची फसवणूक होत आहे.

- संजय खांडेकरअकोला: मोठ्या आणि नामांकित कंपनीच्या नावाखाली सामान्य ग्राहकांना लुटणारी टोळी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर सक्रिय असून, यातून अनेकांची फसवणूक होत आहे. केवळ मोबाइल डेटा मिळविणे आणि युजरची संख्या वाढविण्यासाठी असे प्रयोग होत असल्याचे समोर येत आहे.ई-कॉमर्समध्ये सर्वांत मोठी आणि नामांकित असलेल्या कंपनीच्या नावे गत काही दिवसांपासून व्हॉट्स अ‍ॅपवर एक मॅसेज सातत्याने फॉरवर्ड केल्या जात आहे. अमूक एक वस्तू केवळ १० टक्के विशेष डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे. तातडीने आॅर्डर करा म्हणून मॅसेज एकाकडून १० व्यक्तींकडे आणि १० व्यक्तींकडून हजारो व्यक्तींकडे पाठविले जात आहेत. नामांकित कंपनीच्या नावे मेगा डिस्काउंट असल्याने अनेकजण या फसव्या मॅसेजला बळी पडत आहेत. कधी नामांकित मोठ्या कंपनीच्या नावे तर कधी जागतिक नामांकित स्पोर्ट्स कंपनीच्या नावाखाली असे मॅसेज व्हॉट्स अ‍ॅपवर येऊन धडकतात. गत काही महिन्यांपासून अशा फसव्या नेटवर्क जोडणीचे मॅसेज व्हॉट्स अ‍ॅपवर जाणीवपूर्वक पसरविले जात असून, यावर कुणाचाही अंकुश नाही. पोलीस गुन्हे शाखेच्या सायबर सेलने त्यावर लक्ष ठेवून या जाळेचा शोध घेऊन यातील प्रमुख टोळी हुडकून काढावी, अशी मागणी अकोल्यातील व्यक्तींकडून होत आहे.असे टाकले जाते जाळे!नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर ३० ते ९० टक्के सूट असल्याचे भासवून आधी व्हॉट्स अ‍ॅपवर मॅसेज टाकला जातो. या वस्तू खरेदीची नोंद करण्यासाठी तातडीने आॅर्डर करण्याचे सूचविले जाते. आॅर्डर करताच एक नवा मॅसेज लगेच समोर येतो. १० मित्रांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर हा मॅसेज फॉरवर्ड करा, सोबतच १० व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर मॅसेज फॉरवर्ड करण्याचे सुचविले जाते. हा मॅसेज करेपर्यंत एका व्यक्तीने किमान शंभर लोकांना हा मॅसेज पाठविलेला असतो. अवघ्या काही मिनिटांत झालेल्या या प्रकारानंतर आॅर्डर स्वीकारल्या जात नसल्याचे कळते. तोपर्यंत मॅसेज फॉरवर्ड करणाऱ्यांची संख्यादेखील हजारोंच्या घरात पोहोचलेली असते. वस्तूंची बुकिंग तर होत नाही, उलटपक्षी पोपट झाल्याचे सर्वांच्या लक्षात येते.युजरची संख्या दाखविण्याचा प्रयोगआॅनलाइन यंत्रणेवर युजरच्या संख्येला फार महत्त्व असते. कोट्यवधींची उलाढाल केवळ युजर सिद्धतेवरून होते. यातील आर्थिक उलाढालीवर लक्ष केंद्रित करून गुन्हेगार प्रवृत्तीची टोळी अशा प्रकारचे फसवे प्रयोग करीत आहे. आमिषाला बळी पडून काही तासांत एखाद्या साइटचे युजर हजारोंच्या संख्येत फुगविले जातात.

 

टॅग्स :AkolaअकोलाfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी