शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वेतन निश्चितीसाठी वसुली करणारे चौघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 15:35 IST

अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत चार कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी दिला.

अकोला : कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी पंचायत समिती स्तरावर संबंधित कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केल्याची प्रकरणे गेल्या काही दिवसांत सातत्याने उघड झाली आहेत. याप्रकरणी अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत चार कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी दिला. विशेष म्हणजे, ही प्रकरणे प्रलंबित असल्याने सुटीच्या दिवशीही काम करण्याची वेळ आली आहे.सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्यासाठी निश्चिती करण्याची प्रक्रिया संबंधित विभागांना पूर्ण करावी लागते. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील विभाग वगळता पंचायत समित्यांमध्ये वेतन निश्चितीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या, जिल्हा परिषदेच्या १४ विभागातील मिळून ४,५२६ प्रकरणे आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित ३,६७८ प्रकरणे प्रलंबित आहेत. मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये कर्मचारी वेतन निश्चितीसाठी पैसे मागत असल्याच्या तक्रारीही मध्यंतरी झाल्या. त्यानंतर अकोल्यासह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमध्ये विशेषत: शिक्षकांना रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या. शनिवारी वेतन निश्चितीसाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू ठेवण्यात आले. तक्रारी झाल्याने त्याची माहिती घेण्यात आली. यावेळी अकोला पंचायत समितीमध्ये सर्वाधिक म्हणजे ८४२ प्रकरणे प्रलंबित असल्याने कारणांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये पंचायत समितीमध्ये कार्यरत संबंधित कर्मचारी पैसे उकळत असल्याचे पुढे आले. त्यामुळे चौघांना निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. सर्वच पंचायत समित्यांमध्ये प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता संबंधित कर्मचाºयांची चौकशी करून कारवाई करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.- निलंबित झालेले कर्मचारीवेतन निश्चितीची प्रकरणे प्रलंबित ठेवल्याने अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत चौघांना निलंबित करण्यात आले. त्यामध्ये पी. के. चंदेल, सय्यद रियाजोद्दीन, पी. एम. मोहोड व डी. ए. महल्ले यांचा समावेश आहे.- पंचायत समितीनिहाय प्रलंबित प्रकरणेअकोला           ८४२अकोट             ६०४बार्शीटाकळी    ४६१तेल्हारा           ३९४मूर्तिजापूर      ५२६बाळापूर          ५७२पातूर              ३८९

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदsuspensionनिलंबन