युक्रेनमधून चार विद्यार्थी भारतात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 12:00 PM2022-03-05T12:00:12+5:302022-03-05T12:00:17+5:30

Four students from Ukraine returned to India : तिघे दिल्ली येथे, तर एकजण पुणे येथे पोहोचला.

Four students from Ukraine returned to India | युक्रेनमधून चार विद्यार्थी भारतात परतले

युक्रेनमधून चार विद्यार्थी भारतात परतले

Next

अकोला : युक्रेनमध्ये शिकत असलेल्या अकोला जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे. त्यांपैकी तिघे दिल्ली येथे, तर एकजण पुणे येथे पोहोचला असून, उर्वरित एकजण विदेशात मात्र भारतीय दूतावासात सुरक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मोहित विजय मालेकर, हुसेनउल्ला खान व अब्दुस साबूर अहमद हे विद्यार्थी दिल्ली येथे पोहोचले आहेत; तर जॅक निक्सन हा पुणे येथे मामाच्या घरी पोहोचला आहे. उर्वरित प्राप्ती भालेराव ही विद्यार्थिनी युक्रेनची सीमा पार करून स्लोवाकियामध्ये सुरक्षित ठिकाणी असून भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: Four students from Ukraine returned to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.