शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

फोर-जी केबल प्रकरण; दोन दिवसांत एकूण २१ किलोमीटर केबलचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:33 PM

अकोला : महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवित शहरात फोर-जी सुविधेसाठी अनधिकृतरीत्या फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाºया विविध मोबाइल कंपन्यांचा मुखवटा ...

अकोला: महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवित शहरात फोर-जी सुविधेसाठी अनधिकृतरीत्या फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाºया विविध मोबाइल कंपन्यांचा मुखवटा मनपाच्या तपासणीत टराटरा फाटत असल्याचे समोर येत आहे. मंगळवारी बांधकाम विभागाने शहरात झोननिहाय केलेल्या तपासणीदरम्यान चक्क १३ किलोमीटर अंतराची केबल आढळून आली. गत दोन दिवसांत मनपाने २१ किलोमीटर अंतराची अनधिकृत केबल शोधून काढली असून, उर्वरित केबलचा शोध घेतला जात आहे.गत दोन वर्षांपासून महापालिका क्षेत्रात फोर-जी सुविधा देण्याच्या नावाखाली विविध मोबाइल कंपन्यांनी मनपा प्रशासनाची परवानगी न घेता तसेच प्रशासनाकडे ‘रिस्टोरेशन चार्ज’ जमा न करताच मनमानी पद्धतीने फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाक ल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणाचा ऊहापोह झाल्यानंतर मनपा प्रशासनाने विविध मोबाइल कंपनीच्या प्रतिनिधींना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले असता, अनेक कंपन्यांनी असहकार्याचे धोरण अवलंबित प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ही बाब ध्यानात घेता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मोबाइल कंपन्यांनी टाकलेले भूमिगत केबलचे जाळे शोधण्याचे निर्देश जारी केले. तसेच यासंदर्भात शहरात फोर-जी सुविधा देणाºया सर्वच मोबाइल कंपन्यांना दस्तऐवज घेऊन १६ जानेवारी रोजीच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. यादरम्यान मनपाच्या बांधकाम विभागाने १३ व १४ जानेवारी रोजी शहरात झोननिहाय खोदकाम केले असता, त्यांना दोन दिवसांत २१ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबलचे जाळे आढळून आले आहे.

सत्ताधारी भाजपने साधली चुप्पीशहरातील विकास कामांचा व पारदर्शी कारभाराचा गवगवा करणाऱ्या सत्ताधारी भाजपने फोर-जी केबल प्रकरणी सोयीस्कर चुप्पी साधल्याचे दिसत आहे. मनपाच्या प्रशासकीय कारभारात जातीने लक्ष देऊन कामकाजात सुधारणा करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी फोर-जी प्रकरणात अनभिज्ञ कसे राहू शकतात, असा सवाल खुद्द भाजपच्याच अंतर्गत गोटात उपस्थित केला जात आहे.बांधकाम विभाग दिशाभूल करण्यात पटाईतशहरात काही ठरावीक मोबाइल कंपन्यांनी सुमारे ४४ किलोमीटरपेक्षा अधिक लांब फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्याची माहिती आहे. या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी मोठ्या कंपन्यांकडून ९० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे जाळे टाकण्यात आल्याचा अंदाज वर्तविला आहे. मनपाचा सुमारे ३० ते ३५ कोटींचा महसूल बुडविणाºया कंपन्यांच्या कामाबद्दल बांधकाम विभागातील प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून प्रशासनासह लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात असल्याची माहिती आहे.बांधकाम विभागाच्या तपासणीत मंगळवार, १३ किलोमीटर अंतराची अनधिकृत केबल आढळून आली आहे. दिवसेंदिवस या प्रकरणात नवनवीन तथ्य उजेडात येत असल्याने दोषी आढळणाºया मोबाइल कंपन्यांची गय केली जाणार नाही,-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका