शहरातील एका क्रिकेट अकादमीने क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक सुलक्षण कुळकर्णी यांना प्रशिक्षणासाठी अकोल्यात आणले आहे. अकोल्यात सुलक्षण कुळकर्णी नियमितपणे असणार असल्याने आता अकोल्यात आणि परिसरातून सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा तयार होणार असल्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. याच पत्रकार परिषदेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे व्यवस्थापक राहिलेले विदर्भ क्रिकेट अकादमीचे राजन नायर यांनी क्रिकेट विश्वातील अनुभव कथन करीत अकोल्यात हुशार आणि चलाख क्रिकेट खेळाडूंना शक्य तितक्या लवकर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतील, असे सांगितले. या पत्रकार परिषदला परेश सेदानी, राजेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अकोल्यात माजी रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी देणार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST