शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

माजी राज्यमंत्री, सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 19:04 IST

अकोला : राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच अकोल्यातील जेष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

ठळक मुद्दे त्यांनी १९८५ ते ९० दरम्यान अकोल्याच्या बोरगावमंजू विधानसभा मतदार संघातून विधानसभेत प्रतिनिधीत्व केले.ते १९८६ ते १९८८ सहकार खात्याचे राज्यमंत्री होते. अकोला बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सोसायट्यांवर त्यांची सत्ता आहे. यासोबतच अकोला जिल्हा बँकेवरही त्यांची पकड होती.

अकोला : राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच अकोल्यातील जेष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अकोल्यासह अमरावती विभागाच्या राजकारण व सहकारक्षेत्रावर वसंतराव धोत्रे यांची छाप होती . त्यांनी १९८५ ते ९० दरम्यान अकोल्याच्या बोरगावमंजू विधानसभा मतदार संघातून विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. ते १९८६ ते १९८८ सहकार खात्याचे राज्यमंत्री होते. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणून त्यांची ओळख आहे. अकोला बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सोसायट्यांवर त्यांची सत्ता आहे. यासोबतच अकोला जिल्हा बँकेवरही त्यांची पकड होती. विदभार्तील सर्वात मोठया अशा शिवाजी शिक्षण संस्थेचे ते १० वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत. गेल्या वर्षी या संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्या गटाची सत्ता स्थापन झाल्याने धोत्रे यांचे ‘शिव’ परिवारातील महत्व पुन्हा वाढले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर शनिवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांचे ते सख्खे चुलतभाऊ होत. शरद पवारांचे विदर्भातील कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर त्यांना साथ देणाऱ्या विदर्भातील प्रमुख नेत्यांत त्यांचा समावेश होता. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सहकार क्षेत्रातला एक मार्गदर्शक हरविल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणDeathमृत्यू