शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:28 IST

एक विशेष व्हॅन तयार करून त्याद्वारे जंगल क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होत असल्याने प्रादेशिक वन विभागाने जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी एक विशेष व्हॅन तयार करून त्याद्वारे जंगल क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून जंगलात वणवा लागला तरी त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी ही जागृती महत्त्वाची ठरत आहे.क्षेत्र पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात येत असून, त्यानंतर अकोट तालुक्यातही बराच भाग जिल्ह्यातील जंगल क्षेत्रात आहे. या जंगलांमध्ये आग लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यापासून वन्य जीवांना मोठा धोका दरवर्षीय असतो. यासोबतच वणव्यामुळे प्रदूषणातही वाढ होत असल्याने झाडांचे मोठे नुकसान होते. हे रोखण्यासाठीच प्रादेशिक वन विभागाने आता कंबर कसली असून, एक विशेष पथक आणि विशेष व्हॅनद्वारे वणवा प्रभावित क्षेत्र तसेच गावांमध्ये या पथकाद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.त्यामुळे कोणत्याही जंगलात आग लागल्यास त्याची माहिती तातडीने मिळून लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.

पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात जागृतीपातूर व बार्शीटाकळी तालुक्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, या ठिकाणावरील गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे या जंगल क्षेत्रात आग लागल्यास ग्रामस्थांकडून तातडीने माहिती पोहोचविण्यात येते. यावरून आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यास वन विभागाला मदत होत असल्याने जंगल क्षेत्रातील गावांमध्ये सुरू असलेली जनजागृती वणवा रोखण्यासाठी मोलाची ठरत आहे.

प्रदूषण रोखण्याचे मोठे प्रयत्नजंगलात लागणाºया मोठ्या प्रमाणातील वणव्यांमुळे वन्य जीवाला झळ पोहोचण्याचा मोठा धोका आहे. याचेच परिणाम प्रदूषणाच्या माध्यमातून भोगावे लागणार आहे. त्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळवून प्रदूषण होणार नाही, याची पूर्णत: खबरदारी प्रादेशिक वन विभागाकडून घेण्यात येत आहे. वन विभागाच्या या विशेष आणि अनोख्या उपक्रमामुळे वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.

जंगलातील वणवा ज्यांच्यामुळे लागतो, त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी एक विशेष पथक आणि व्हॅन तयार करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून वणवा प्रभावित भागामध्ये रोजच जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे काही ग्रामस्थांमध्ये आता जागृती येत असून, वणवा रोखण्यासाठी या ग्रामस्थांनीच आता मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वन विभागाचे प्रयत्न फळाला येत असल्याचे वास्तव आहे.- विजय माने,उपवनसंरक्षक,प्रादेशिक वन विभाग, अकोला.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलAkolaअकोला