शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

लोकनृत्य, संस्कृती, परंपरा जपण्याची तरुणाईची धडपड

By admin | Updated: September 19, 2014 02:17 IST

युवा महोत्सवात तरुणांचे समाजसुधारणेला प्राधान्य, चित्रपटातील गाण्यांचा नामोल्लेखही नाही.

विवेक चांदूरकर /अकोलातरुण म्हटले की धांगडधिंगा, महाविद्यालयातील गॅदरिंग, कार्यक्रमात पॉप संगीत किंवा हिंदी चित्रपटातील गाजलेली ह्यचिकनी चमेलीह्ण, ह्यआता माझी सटकलीह्ण अशी त्या- त्या वर्षात गाजत असलेल्या गाण्यांवरील नृत्य, हेच चित्र आपल्याला दिसते. मात्र, यावर्षीचा युवा महोत्सव या सर्वाला अपवाद ठरत आहे. या महोत्सवात सादर होत असलेले नाटक, एकांकिका, लोकनृत्य यामधून आपली लोप पावत असलेली लोककला, ग्रामीण भागातील पारंपरिक नृत्यांचे प्रतिबिंब उमटले. समाजजागृतीवर भर देत आपली संस्कृतीची जपवणूक करण्याचाच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला तरुण श्रोत्यांकडून मिळत असलेली टाळ्यांची साद अजूनही या परंपरेची आवड व आकर्षण कायम असल्याचे दाखवत होती. शिवाजी महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव सध्या सुरू आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी १८ सप्टेंबर रोजी महाविद्यालय परिसरातील स्व. डॅडी देशमुख खुला रंगमंच, वसंत सभागृह, मराठा मंडळ मंगल कार्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. लोकनृत्यामध्ये गोंडी संस्कृती, बंजारा समाजातील तीज महोत्सव, राजस्थानी नृत्य तरुणांनी सादर केले. हे नृत्य सादर करीत असताना त्यासोबतची गाणी विद्यार्थ्यांनी स्वत: गायिली आणि तेही गोंडी, बंजारा व राजस्थानी भाषेमधून. त्यामुळे महोत्सवात एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले. एकविसावी सदी असेल, फेसबुक व्हॉट्स अँपचा वापर असेल, पॉप संगीत, पाश्‍चात्त्य चित्रपटांचा भडीमार होत असेल मात्र, आपले तरुण अजूनही शाबूत आहेत व ते आपली संस्कृती, परंपरेलाच प्राधान्य देत असल्याचे युवा महोत्सवातून निदर्शनास आले. चित्रपटांच्या गीतावर, पॉप संगीतावर ही तरुणाई थिरकली नसून, आपली बोली भाषा, लोककला, संस्कृती, पारंपरिक सण, नृत्य जपण्याकरिता, त्याचा प्रचार-प्रसार करण्याचीच धडपड तरुणांमध्ये दिसत होती.