शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात भाजपमधील ‘इनकमिंग’वर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:40 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने ६ आॅगस्ट रोजी अकोल्यात येत असल्याने त्यांच्या सभेत अकोला व वाशिममधील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत आहेत.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्य स्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांचे भाजपमध्ये सुरू असलेल्या ‘इनकमिंग’चे लोण आता स्थानिक पातळीवरही येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने ६ आॅगस्ट रोजी अकोल्यात येत असल्याने त्यांच्या सभेत अकोला व वाशिममधील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण सध्या तापले असून, उमेदवारीसाठी इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षांना घुमारे फुटले आहेत. त्यामुळे उमेदवारी हा कळीचा मुद्दा ठरणार असून, उमेदवारीपासून वंचित राहणारे दुसऱ्या पक्षाचा आधार घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अकोल्यात पाच विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत, तर उरलेल्या बाळापूर मतदारसंघात उमेदवारीची मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या कोणत्याही नेत्याला भाजपमध्ये जाण्यात मर्यादा आहेत, अशा पृष्ठभूमीवर दुसºया फळीतील नेते व प्रभावी कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील काही सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवेळी भाजपमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे.

विधानसभेसाठी अडचण; जिल्हा परिषद लक्ष्यभाजपचा वाढता प्रभाव पाहता विरोधी पक्षातील अनेकांना भाजपमध्ये जाण्याची इच्छा असली तरी अकोल्यात ‘विधानसभेची उमेदवारी’ देण्यामध्ये भाजपसमोर मर्यादा आहेत; मात्र आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वेधही सुरू झाले आहे, त्यामुळे मिनी मंत्रालयात जाण्यास इच्छुक असलेले भाजपचा मार्ग धरण्याची शक्यता आहे.

काही नेते प्रवेशाच्या उंबरठ्यावरअकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील काही नेते भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. आपल्या पुत्राच्या राजकीय पुनर्वसनासाठी एक ज्येष्ठ नेतृत्व भाजपात येऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे, तर कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी गेल्या आठवड्यात अकोला व वाशिममध्ये केलेल्या दौºयात अशा नेत्यांसोबत गुफ्तगू झाल्याचीही चर्चा आहे.

टॅग्स :BJPभाजपाAkolaअकोलाPoliticsराजकारण