शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

युवक-युवती वळताहेत आयटीआयकडे; जागांपेक्षा अर्ज दुप्पट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 10:59 IST

Flow of students to ITI : औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित कामगारांची मागणी वाढल्यामुळे युवक-युवती आयटीआयकडे वळत आहेत.

अकोला : आयटीआय अर्थात तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. काही वर्षांपूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस पडल्या होत्या; परंतु औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित कामगारांची मागणी वाढल्यामुळे युवक-युवती आयटीआयकडे वळत आहेत. यंदा २ हजार ७९६ जागांसाठी ६ हजार ९६५ जणांनी अर्ज केले आहे.

आयटीआय प्रवेशासाठी आता स्पर्धा वाढत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या २ हजार ६९६ हजार जागा आहेत. आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेस अधिकृत सुरुवात झाली आहे. १९ ऑगस्टपर्यंत ६ हजार ९६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. ३१ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. गत काही वर्षांपासून आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रात आयटीआय झालेल्या युवकांना मोठी मागणी आहे. तशा संधीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.

 

अर्ज स्थिती

एकूण जागा २७९६

आलेले अर्ज ६९६५

 

जिल्ह्यातील आयटीआय

शासकीय ८

खासगी २

 

प्रवेश क्षमता

शासकीय जागा २६१६

खासगी जागा १८०

 

या कारणांमुळे चांगला प्रतिसाद

अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कंपन्या आयटीआय विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संधी देत आहेत.

अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जागेवरच रोजगार मिळतो.

त्यामुळे विद्यार्थी आयटीआयला अधिक पसंती देत आहेत. अकोला जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ८ असून, खासगी संस्था २ आहेत.

विद्यार्थी म्हणतात...

दहावी, बारावीनंतर लगेच रोजगाराची संधी मिळविण्यासाठी आयटीआय ही एकमेव संस्था आहे. यामाध्यमातून रोजगारासोबत स्वयंरोजगारही करता येऊ शकतो. कंपनीमध्ये नोकरीसाठी आवश्यक आहे.

- विपुल इंगळे

शिक्षणानंतर लवकर नोकरीची संधी हवी आहे. स्वयंरोजगारही करावयाचा असल्यास आयटीआयमध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदा अर्ज केला असून दहावीतही चांगले गुण मिळाले आहे.

- राजेश निकाळजे

 

म्हणून वाढले आयटीआयचे विद्यार्थी

आयटीआयमध्ये व्यावसायिक कौशल्यावर अधिक भर दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळते. तसेच स्वयंरोजगारही मिळविणे शक्य होते. आयटीआयमुळे रोजगाराच्या संधीही वाढल्या आहे. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

- प्रकाश जयस्वाल, प्राचार्य

 

कौशल्यासाठी आयटीआयमध्ये प्रशिक्षण मिळतो. मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आयटीआयचे ट्रेड महत्त्वाचे आहे. यामाध्यमातून जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये रोजगारही मिळविता येऊ शकतो. विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीही मिळविता येते.

 

- राम मुळे, प्राचार्य

टॅग्स :Akolaअकोलाiti collegeआयटीआय कॉलेज