शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पुराने शेती गेली खरडून; पिकाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:36 IST

हातरुण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे नाल्याच्या पुराने शेतात थैमान घातल्याने तीन एकर शेतातील अंकुरलेले पीके उद्धस्त झाले आहे.

हातरुण -  हातरुण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे नाल्याच्या पुराने शेतात थैमान घातल्याने तीन एकर शेतातील अंकुरलेले पीके उद्धस्त झाले आहे. तीन एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खरडून गेलेल्या शेतात चिखल साचला असून मोठं मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ही शेती सध्या तरी पेरणी योग्य करता येत नाही.  हातरुण येथील शेतकरी इलियास खान ल्याकत खान यांच्या गट नंबर ४६५ मधील तीन एककर शेतातील अंकुरलेले पिक नाल्याच्या पुरात शनिवारी वाहून गेल्याने ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी इलियास खान यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या पावसामुळे नाल्याच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने या नाल्याकाठच्या शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. सुपीक जमीनीचा थर वाहून गेला आहे. खरडून गेलेल्या शेतात सध्या चिखल साचला असून शेतात कोणतेही काम करता येत नाही. सुपीक मातीचं झालेलं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. हातरुण ते कारंजा या मार्गावरील नाल्याच्या पुराने नाल्याकाठच्या शेतातील पिकाची हानी झाली आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकरी इलियास खान यांनी केली आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. आणि पेरणी नंतर पीकही अंकुरले. मात्र उगवलेले शेतातील  उडीद, मुंग, सोयाबीन, तुर, ज्वारी, कपाशीचे पीक पुर आल्याने खरडून गेल्याने शेतात काहीच राहिले नाही. काही शेताला तर तलावाचे स्वरूप पाहायला मिळाले. त्यामुळे एकरी हजारो रुपये खर्च केलेले पीक वाया गेले. पिकाचे नुकसान झालेले असताना नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी मुहूर्त कधी सापडतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नुकसानीचे सर्वेक्षण करा - गव्हाणकर

दमदार पाऊस झाल्याने नाल्याच्या पुराने पिकाची हानी झाली आहे.  नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून मदत देण्याची मागणी बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी बाळापूर महसूल विभागाकडे केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी