शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:29 IST

अकोला : हिंगणा म्हैसपूर येथून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करीत असलेले पाच ट्रक अकोला पोलिसांनी पकडले असून, ते खदान पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहेत.

अकोला : हिंगणा म्हैसपूर येथून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करीत असलेले पाच ट्रक अकोला पोलिसांनी पकडले असून, ते खदान पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहेत. रेती माफियांचा प्रचंड धुडगूस सुरू असून, मध्य प्रदेशातून आलेला एक ट्रकही सिव्हिल लाइन पोलिसांनी जप्त केला आहे.बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील हिंगणा व म्हैसपूर येथील नदी पात्रातील मध्यरात्री अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करण्यात येऊन त्यांची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती गावातील ग्रामस्थांना मिळाली. त्यावरून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधित चारही टिप्पर ताब्यात घेतले. यावेळी त्या ठिकाणी हाणामारीसुद्धा झाल्याची घटना घडली. नंतर शंभर क्रमांकावर यासंदर्भातील माहिती ग्रामस्थांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. सदर कार्यक्षेत्र हे बाळापूर पोलिसांच्या हद्दीमध्ये येत असल्याने नियंत्रण कक्षाच्या पोलिसांनी ही माहिती बाळापूर पोलिसांना दिली. त्यानंतर चारही टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेऊन ते खदान पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जमा केले आहेत. या वाळूच्या अवैध उत्खननाची माहिती महसूल प्रशासनाला दिली असून, शनिवारी यावर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातून विनारॉयल्टी वाळूची वाहतूक करणाऱ्या एक ट्रकला सिव्हिल लाइन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. यावर महसूल विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे.रेती माफियांचा हैदोस वाढला!म्हैसांग, आपातापा, कट्यार, कपिलेश्वर या परिसरासह हिंगणा म्हैसपूर, तेल्हारा व बाळापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करण्यात येत असून, अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. याकडे महसूल प्रशासनाची डोळेझाक होत असल्याने ग्रामस्थ पोलिसांना माहिती देत आहेत. पोलिसांनी विविध ठिकाणांवर कारवाई करीत अशा प्रकारे रेतीची वाहतूक व चोरी करणारे ट्रक जप्त केले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी