शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

बार्शीटाकळी शहरातील पाच हजार नवीन शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 14:07 IST

बार्शीटाकळी: शहरातील पाच हजार नवीन शिधापत्रिकाधारक नागरिकांना स्वस्त धान्य वाटप योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. गत काही महिन्यांपासून शिधापत्रिकाधारक नागरिक धान्यापासून वंचित आहेत.

बार्शीटाकळी: शहरातील पाच हजार नवीन शिधापत्रिकाधारक नागरिकांना स्वस्त धान्य वाटप योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. गत काही महिन्यांपासून शिधापत्रिकाधारक नागरिक धान्यापासून वंचित आहेत.बार्शीटाकळी शहरामध्ये १२७0 केशरी कार्डधारक आहेत. यातील शेकडो शिधापत्रिकाधारक हे भूमिहीन व दुर्बल घटकातील आहेत. त्यांना स्वस्त धान्याची गरज असतानाही पुरवठा विभागाकडून त्यांना धान्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. यासंदर्भात अनेक नागरिकांनी कार्ड असूनही धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या; परंतु या तक्रारीची दखलही पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. अन्नसुरक्षा योजनेमधून भूमिहीन व दुर्बल घटकातील केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना स्वस्त धान्याचा पुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन २0 डिसेंबर रोजी तहसीलदार रवी काळे यांना बार्शीटाकळी नगरपंचायतचे अध्यक्ष महेफुज खान यांनी दिले. निवेदनामध्ये शिधापत्रिकाधारक नागरिकांना धान्यापासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करू नये, त्यांना तातडीने धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही नगरपंचायतचे अध्यक्ष महेफुज खान यांनी केली आहे. त्यावेळी भारत बोबडे, अन्सार खान, दत्ता साबळे, बबलू काजी, अब्दुल अकील, सुदेश जामनिक, श्रावण भातखड, गुड्डूभाई, मोहम्मद शोएब, अर्शद खान, रोशन शहा, मोहम्मद सादिक व अ‍ॅड. विनोद राठोड उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळी