शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी पाच पर्यायांमुळे पोलिसांच्या मनसुब्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 12:53 IST

एकाच उपविभागात राहण्यासाठीचा खटाटोप करणाºया पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी यापूर्वी तीन ठिकाणचे पर्याय मागण्यात येत होते; मात्र आता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाच पर्यायी ठिकाणांचा फॉर्म्युला अवलंबविल्याचे समजते. एकाच उपविभागात राहण्यासाठीचा खटाटोप करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. एकाच उपविभागात तसेच एकाच ठाण्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांवर आता मर्जीचे ठिकाण सोडण्याची वेळ येणार असल्याचे संकेत आहेत.अकोला पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून १५ टक्के बदल्या करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी या बदल्या करताना पोलीस कर्मचाऱ्यांना तीन पर्यायी ठिकाणे मागण्यात येत होती. त्यामुळे काही पोलीस कर्मचारी त्याच उपविभागात राहून त्यांना हवी तशा प्रकारची ड्युटी करीत होते; मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक गावकर यांनी पाच पर्याय मागविले होते. त्याचप्रमाणे आता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीसुद्धा पाच पर्यायी ठिकाणांचा फॉर्म्युला अवलंबल्याचे समजते. त्यामुळे अनेक वर्षांपासून ठाण मांडलेल्या तसेच संलग्नच्या नावे एकाच उपविभागात राहण्यासाठी प्रयत्न करणाºया पोलीस कर्मचाºयांचे मनसुबे उधळले जाणार असल्याची चर्चा आहे. या पाच पर्यायी कारणामुळे संबंधित कर्मचाºयाला उपविभागाच्या बाहेर ड्युटी करण्याचे काम पडणार असल्याचे निश्चित आहे. याच कारणामुळे अनेकांची आता पाचावर धारण बसली आहे. ही बदली प्रक्रिया शासनाच्या आदेशानंतर पूर्ण करण्यात येत असून, अकोला पोलीस दलातील ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत.अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी तिथेच!काही पोलीस अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील कर्मचारी हे त्यांना हव्या असलेल्या ठिकाणीच ड्युटी करीत असल्याचे वास्तव आहे.काही अधिकाºयाच्या मर्जीतील कर्मचाºयांना त्यांच्याच अधीनस्त ठेवण्यासाठी ते अधिकारीच प्रयत्न करीत असल्याचे समजते.त्यामुळे नवीन दमाचे तसेच प्रामाणिक असलेल्या पोलीस कर्मचाºयांना काम करण्याची संधी मिळत नसल्याचेही वास्तव आहे.

गोपनीय सेटिंगबदल्यांसाठी काही जणांनी नेहमीप्रमाणे सेटिंग लावली आसल्याचे बोलले जात आहे; मात्र पोलीस बदली प्रक्रियेत पोलीस अधीक्षक यांनी स्वत: लक्ष केंद्रित केल्याने संबंधितांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असल्याचे समजते.अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात काही कर्मचारी तब्बल सहा ते सात वर्षांपासून कार्यरत आहेत, तर हेच कर्मचारी यापूर्वी अकोट शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस