शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला ‘एमआयडीसी’तील गोदामातून पाच लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:56 IST

अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामात लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा ठेवला असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकू न तब्बल पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.

अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामात लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा ठेवला असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकू न तब्बल पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.एमआयडीसीतील एका गोदामात वाहीद नामक व्यक्तीचा गुटखा असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सदर गोदामावर छापा टाकून पाच लाख रुपयांचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला. त्यानंतर गुटख्याच्या मालकाचा शोध घेण्यात आला असून, त्यास समजपत्र देऊन सोडण्यात आले. गुटखा जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्यानंतर त्यांनी सुटीवर असल्याचे कारण समोर करून या ठिकाणी येण्याचे टाळल्याचे स्पष्ट दिसून आले. यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची गुटखा माफियांसोबत असलेले साटेलोटे उघड झाले. याप्रकरणी गुटखा माफियाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अळसपुरे यांनी दिली. ही कारवाई विशेष पथकाने केली.---------------------------------‘एफडीए’ची टाळाटाळगुटखा जप्त केल्याची माहिती विशेष पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांना दिल्यानंतर त्यांनी सुटीवर असल्याचे कारण सांगून घटनास्थळावर येण्याचे टाळले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाºयांचे गुटखा माफियांशी आर्थिक कनेक्शन असल्याची चर्चा घटनास्थळावर होती. याच कनेक्शनच्या मिठाला जागत त्यांनी कारवाई करण्यासाठी माघार घेतल्याचे बोलल्या जात आहे. जुन्या बाटलीत नवी दारूगुटख्याच्या मोठमोठ्या कंपन्यांकडून गुटखा माफियांमध्ये स्पर्धा लावण्यात आल्याची माहिती आहे. याच स्पर्धेतून हद्दपार झालेले काही जुने गुटखा माफिया आता पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा डाव साधत असल्याची माहिती आहे. यामध्ये नरेश अन् नीलेश या दोन जुन्या गुटखा माफियांनी पुन्हा मोठा गोरखधंदा सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामधील एक गुटखा माफिया पोलिसांचाच खबºया असल्याचे त्याचा गुटखा व्यवसाय मोठा तेजीत असून, त्याला पोलिसांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. खामगावात बडा माफियाखामगावात गुटख्याचा मोठा माफिया असून, त्याचेच चट्टे-बट्टे अकोल्यात हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात चालवित असल्याची माहिती आहे. यामध्ये जुन्या किराणा बाजारातील काही छोटे-मोठे गुटखा माफिया प्रचंड फोफावले असून, त्यांच्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी