शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १०३ नवे पॉझिटिव्ह, १४६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:59 IST

अकोला शहरातील तीन व मुर्तीजापूर तालुक्यातील दोन अशा एकूण पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८६ वर गेला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार, १४ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील तीन व मुर्तीजापूर तालुक्यातील दोन अशा एकूण पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८६ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १०३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५७२३ झाली आहे. दरम्यान, १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्या ११६५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १०३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जीएमसी येथील आठ, मलकापूर येथील सहा , मुर्तिजापूर येथील पाच, कौलखेड येथील चार, अकोट, आदर्श कॉलनी, जठारपेठ, तापडीया नगर येथील प्रत्येकी तीन, रामनगर, खडकी, गौरक्षण रोड, गीतानगर, मोठी उमरी, वाडेगाव, खदान येथील प्रत्येकी दोन, दुर्गा चौक, इडंस्ट्रीयल कोर्ट, चान्नी ता. पातूर, सुकोडा ता.अकोला, चांदूर, सोनोरी ता.मुर्तिजापूर, जयहिंद चौक, खोलेश्वर, लहान उमरी, वाशिम बायपास, रणपिसे नगर, वानखडे नगर, जूने शहर, विजय नगर, खेतान नगर, सुधीर कॉलनी, शिवाजी कॉलेजजवळ, केला प्लॉट, उदयवाडी खरप रोड, आगर, कच्ची खोली, रामदास पेठ, जोगळेकर प्लॉट, पिंजर, कृषी नगर, सिव्हील लाईन, दहिहांडा व दोंडगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये बोरगाव मंजू व आगर येथील प्रत्येकी चार, पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर, रुस्तमाबाद ता. बार्शीटाकळी, लहरीया नगर, चोहट्टा बाजार, गौरक्षण रोड, डाबकी रोड, मोठी उमरी, सिव्हील लाईन, गोडबोले प्लॉट व डोंगरगाव ता. अकोला येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

अकोल्यातील तीन, मुर्तीजापूर तालुक्यातील दोघांचा मृत्यूसोमवारी आणखी पाच जणांचे मृत्यू झाले. डाबकी रोड, अकोला येथील ६० वर्षीय महिला, भिडेवाडी बाळापूर रोड, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, जठारपेठ, सिव्हील लाईन अकोला येथील ८० वर्षीय पुरुष, शिरसो, ता. मुर्तिजापूर, सोनारी ता. मुर्तिजापूर येथील ६४ वर्षीय महिला या पाच रुग्णांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

१४६ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७६, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ६६, ओझोन हॉस्पीटल येथून तीन जण, कोविड केअर सेटर, बाळापूर येथून प्रत्येकी एकअशा एकूण १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.११६५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७२३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४३७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ११६५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या