शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजार वीज ग्राहकांनी घेतला ‘नवप्रकाश’चा आधार!

By admin | Updated: March 13, 2017 02:43 IST

अकोला परिमंडळ; योजनेला जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ

अतुल जयस्वालअकोला, दि. १२- थकीत देयकांमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघू दाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने १ नोव्हेंबर २0१६ पासून ह्यनवप्रकाशह्ण योजना सुरू केली आहे. योजना सुरू झाल्यापासून फेब्रुवारी अखेरपर्यंत महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला व वाशिम या जिल्हय़ांमधील ५,४६१ वीज ग्राहकांनी या योजनेंतर्गत १ कोटी ३६ लाख ३५ हजार ५0३ रुपयांची मूळ थकबाकी भरून वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला आहे.नवप्रकाश योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून, योजनेच्या पहिल्या तीन महिन्यांत मूळ थकबाकीचा भरणा करणार्‍या वीज ग्राहकांना व्याज व विलंब आकाराची रक्कम १00 टक्के माफ करण्यात आली. आता या योजनेला जुलै २0१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाची रक्कम भरणा केल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १00 टक्के रक्कम माफ होणार आहे. या योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणार्‍या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून, ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज नाही. शिवाय, वीज जोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना म्हणजे थकबाकीदार ग्राहकांसाठी सवलतींचा पाऊसच ठरत आहे. या योजनेचा फायदा घेत फेब्रुवारी अखेरपर्यंत अकोला व वाशिम या जिल्हय़ांमधील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ५,४६१ ग्राहकांनी वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला आहे. यासाठी त्यांनी १ कोटी ३६ लाख ३५ हजार ५0३ रुपयांची मूळ थकबाकी भरली आहे. या योजनेतून थकबाकीमुक्त झालेल्या वीज ग्राहकांना महावितरणकडून उद्योग चालू करण्याच्या प्रोत्साहनांतर्गत त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीज जोडणी देण्यात येणार आहे.  तिन्ही मंडळातील विभागनिहाय आकडेवारीविभाग                    ग्राहक             थकबाकीचा भरणाअकोला ग्रामीण        ६७२           १९ लाख ६४ हजार २७0अकोला शहर           २७७           १६ लाख ६९ हजार ७४0अकोट                    ३७९           १४ लाख १७ हजार ५१0बुलडाणा                १५६५           २५ लाख ३५ हजार १२0खामगाव                   ९३६          १९ लाख ८५ हजार २२५मलकापूर                  ९४६         २१ लाख २८ हजार ६१३वाशिम                     ६८७           १९ लाख ३५ हजार ५0३------------------------------------------------------------एकूण                    ५,४६१        १ कोटी ३६ लाख ३५ हजार ५0३