शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील डांग्या सुळक्यावर पाच अकोलेकर गिर्यारोहकांची चढाई

By atul.jaiswal | Updated: March 18, 2024 13:16 IST

मूळागाव हे या सुडक्याचे पायथ्याचे गाव.

अतुल जयस्वाल, अकोला :अकोला डिस्ट्रिक्ट मौन्टीनीरिंग असोसिएशन आणि अमरावती डिस्ट्रिक्ट मौन्टीनीरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,१७ मार्च रोजी पार पडलेल्या गिर्यारोहण मोहिमेत अकोल्यातील पाच गिर्यारोहकांनी नाशिक जिल्ह्यातील अतिशय खडतर असा १७५ फुट उंच डांग्या सुळका सर केला. नाशिक पासून ३० कीमी अंतरावर असलेला डांग्या सुळका सहयाद्रीमधील इगतपुरी तालुक्यात येतो.

मूळागाव हे या सुडक्याचे पायथ्याचे गाव. या गावापासून १ तासाच्या मध्यम श्रेणीचा ट्रेक (पायी चालत जाणे सर्व साहित्य सह) केल्यानंतर सुळक्याच्या पायथ्याचे दर्शन होते. सुळका दिसायला जेवढा दिसायला सुंदर आहे तितकाच चढण्याकरिता खडतर असून याची साधारणतः उंची १७५ फूट इतकी आहे. डांग्या सुळका कोणत्याही पर्वत रांगेमध्ये येत नसून ज्वालामुखीच्या उद्रेकांतून खडकांनी निर्माण होऊन स्वतंत्र उभा आहे. त्याचे हे वैशिष्ट्य गिर्यारोहकांना मोहित करते.

अकोला डिस्ट्रिक्ट मौन्टीनीरिंग असोसिएशन आणि अमरावती डिस्ट्रिक्ट मौन्टीनीरिंग असोसिएशनच्या सदस्यांनी रविवार, १७ मार्च रोजी सकाळी ६ सुमारास मोहिमेला सुरुवात केली. सरळसोट असा हा सुळका चढण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागली. दुपारी २ वाजेपर्यंत यशस्वीरित्या सुळक्यावर चढून सर्वांनी सुखरुप उतराई केली. या मोहिमेत अकोल्याचे अश्विन दाते, धिरज कातखेडे, पूजा जंगम, कल्पेश ढोरे,शिवराज बुले यांच्यासह पुणे येथील शिवम सोनार अमरावती येथील हेमंत थेटे या गिर्यारोहकांनी सहभाग नोंदविला होता. या मोहिमेदरम्यान मुळेगाव येथील ज्ञानेश्वर भगत यांच्याकडून स्थानिक मदत मिळाली.

टॅग्स :NashikनाशिकAkolaअकोला