शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बिअर बार फोडणारे पाच आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:38 IST

त्यांच्याजवळून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : कोरोना संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा गैरफायदा घेत अकोट शहरातील बिअर बार फोडून चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अकोट शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याजवळून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अकोट-हिवरखेड मार्गावर ड्रीम लॅण्ड वाइन बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. लॉकडाउन असताना अज्ञात चोरट्यांनी शटर फोडून बारमधील विविध कंपन्यांची ७९ हजारांची दारू लंपास केली. तसेच बारमध्ये लावलेले सीसी कॅमेरे, एलईडी टीव्ही, एलसीडी, संगणक संच, सीसी रेकॉर्डर असा एकूण १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल २१ एप्रिल रोजी चोरीला गेल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये नंदकिशोर जांभुळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.नाकाबंदी व लॉकडाउनमुळे चोरीचा मोठ्या शिताफीने शोध घेतला असता आरोपी निष्पन्न केले. यावेळी कसून चौकशी करून आरोपी अजय नागोराव वैद्य, गोवर्धन गणेश हरमकर, दिनेश ईश्वरसिंग ठाकूर, गणेश तुळशीदास काळमेघ, तिलक कन्हैय्यालाल अहीर यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ४७ हजार ८३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर, संजय घायल, सुलतान पठाण, गोपाल अघडते, राकेश राठी, विजय सोळंके, विठ्ठल चव्हाण यांनी केली.फोटो आहे

टॅग्स :akotअकोटCrime Newsगुन्हेगारी