शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

अपु-या जलसाठय़ामुळे मत्स्य व्यवसाय धोक्यात!

By admin | Updated: September 20, 2016 00:30 IST

बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती; अल्प पावसामुळे मस्त्य बीज खराब होण्याचा धोका.

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. १९ : शासन विविध सुविधा व अनुदान देत असल्यामुळे शेतकरी आता शेतीसोबतच मत्स्योत्पादनाकडेही वळले आहेत. मात्र यावर्षी जलाशयांमध्ये कमी जलसाठा असल्यामुळे आगामी काळात मत्स्य व्यवसाय धोक्यात आला आहे. गोड्यापाण्यातील मत्स्योत्पादनाचा व्यवसाय पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मात्र बर्‍याच जलाशयात अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. अपुर्‍या पावसामुळे मस्त्य बीज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यामध्ये १३ हजार ६९५ हेक्टर क्षेत्र मत्स्योत्पादनासाठी अनुकूल आहे. शिवाय ४४0 कि.मी. लांबीचे नदीचे पात्रदेखील मत्स्य व्यवसायासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायासाठी जिल्ह्यात जिल्हा योजनेंतर्गत निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात. यामुळे मत्स्य व्यवसायातून आता जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पर्यायी जोडधंदा मिळाला असून, २0१५-१६ मध्ये २५0५ मे. टन भूजल मत्स्योत्पादन जिल्ह्यात झाले आहे.जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाकरिता जिल्हा योजनेंतर्गत निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात. मच्छीमार युवकांना प्रशिक्षण, अवरुद्ध पाण्यातील मत्स्य संवर्धन, मच्छीमार साधनांच्या खरेदीवर अर्थ सहाय्य, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना भाग भांडवल, मच्छीमारांना विमा उतरविण्यासाठी अनुदान इत्यादी योजनांचा यात सहभाग आहे. जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात पाटबंधारे प्रकल्पाखाली मत्स्य बीज निर्मित केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात येथून कटला, रोहू, मृगळ, साप्रनस, ग्रासकार्य, सिल्हर कार्य आदी जातीच्या मत्स्य बीजांची निर्मिती करण्यात येते. ही मत्स्य बीज जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना तलावात सोडण्यासाठी पुरविण्यात येतात. हे मत्स्य बीज मोठे झाल्यानंतर मच्छीमार संस्थांना विकली जातात. मच्छीमार सहकारी संस्था ही बिजे तलावात सोडून त्यांचे संगोपन करतात व मोठी झाल्यावर विकतात. यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात भर पडते. तालुका              मत्स्योत्पादन अनुकूल जलाशय (हेक्टर)जळगाव जामोद         १६४संग्रामपूर                     ९९चिखली                   १0५0 बुलडाणा                  १६३५ देऊळगाव राजा        २३0३मेहकर                    ३२१४सिंदखेड राजा             ७0८लोणार                    १0४४खामगाव                 १७७८शेगाव                        ६६.५0 मलकापूर                   २९मोताळा                 १५५0नांदुरा                       ५५मस्त्यबिजांना धोकाबुलडाणा जिल्ह्यात ४२४ तळे, सरोवर व नद्यांतील पाण्यामुळे मत्स्य उत्पादनाचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे. या अंतर्गत गोडे पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी ७ हजार ७८७.६ हेक्टर जलक्षेत्र आले आहे. गोडे पाण्यातील मत्स्योत्पादनाचा हा व्यवसाय पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे; मात्र बर्‍याच जलाशयाला अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. अपुर्‍या पावसामुळे मस्त्य बीज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.