शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आधी दोघींशी लग्न; तिसरीने बिंग फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:54 IST

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका युवतीशी विवाह करून तिची फसवणूक करणार्‍या व त्यापूर्वी दोन विवाह करणार्‍या रामटेक येथील अट्टल बदमाशास खदान पोलिसांनी सोमवारी अटक केली. या इसमाने दोन विवाह आधीच झालेले असताना ते दडवून तिसरा विवाह केल्याचे तक्रारकर्त्या महिलेचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देरामटेक येथील आरोपी जेरबंदअकोल्यातील मुलीची केली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका युवतीशी विवाह करून तिची फसवणूक करणार्‍या व त्यापूर्वी दोन विवाह करणार्‍या रामटेक येथील अट्टल बदमाशास खदान पोलिसांनी सोमवारी अटक केली. या इसमाने दोन विवाह आधीच झालेले असताना ते दडवून तिसरा विवाह केल्याचे तक्रारकर्त्या महिलेचे म्हणणे आहे.रामटेक येथील रहिवासी सचिन कल्याणसिंह सेंगर याने सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे सांगून अकोल्यातील खदान परिसरातील रहिवासी असलेल्या ममता धरमसिंह ठाकूर यांच्याशी २८ एप्रिल २0१७ रोजी विवाह केला. सचिन सेंगर याने ममता हिला रायगड येथे नोकरीवर असल्याचेही सांगितले, विवाहानंतर सेंगर हा नागपूर येथील निवासस्थानीच राहत असल्याने ममता यांनी पतीला नोकरी संदर्भात विचारणा केली; मात्र त्याने नागपुरातील एका ऑटोमोबाईल कंपनीत असल्याचे सांगून विषय टाळला. त्यानंतर दिवाळीला सचिन सेंगर याचे गाव नागपूर जिल्हय़ातील इंदोरा येथे गेले असताना ममता या घराची साफसफाई करीत होत्या, यावेळी सचिन सेंगर याच्या पहिल्या लग्नाचे काही छायाचित्रे व घटस्फोटाचे दस्तावेज ममता ठाकूर यांना दिसले. त्यांनी पती सेंगरला विचारणा केली असता त्याने पहिल्या पत्नीला आजाराचे कारण सांगून घटस्फोट दिल्याचे ममता ठाकूर हिला सांगितला. हा वाद मिटविल्या जात नाही, तोच ममता ठाकूर यांच्या मोबाइल क्रमांकावर आणखी एका महिलेने फोन करून सचिन सेंगर याची दुसरी पत्नी असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर सेंगरपासून एक अपत्यही असल्याचे ममता ठाकूर यांना मोबाइलवरील महिलेने सांगितले. या प्रकारानंतर फसवणूक झाल्याचे ममता ठाकूर यांच्या लक्षात आले. तिने सासरच्या मंडळींनी हा प्रकार सांगितला असता तिचे सासरे कल्याणसिंग सेंगर, सासू चंद्रकांता सेंगर, नणंद मनीषा, सरिता, दीपा व नीलिमा या सहा जणांनी ममता ठाकूर यांचाच छळ सुरू केला. ममता यांना मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ केला. हा छळ असहय़ झाल्यानंतर तसेच पतीची लबाडी लक्षात येताच त्यांनी पतीची कानउघाडणी करून खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खदान पोलिसांनी पती सचिन सेंगर, सासरे कल्याणसिंग सेंगर, सासू चंद्रकांता सेंगर, ननद मनीषा, सरिता, दीपा व नीलिमा या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक