शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पहिला विवाह लपवून केला दुसरा विवाह; पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:01 IST

अकोला : पुण्यातील रहिवासी एका युवकाचे पहिले लग्न झालेले असताना त्याने पहिला विवाह लपवून अकोल्यातील दुसर्‍या युवतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या प्रकरणी दुसर्‍या पत्नीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध फसवणूक, मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देपुण्यातील मुलाने केला घात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पुण्यातील रहिवासी एका युवकाचे पहिले लग्न झालेले असताना त्याने पहिला विवाह लपवून अकोल्यातील दुसर्‍या युवतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या प्रकरणी दुसर्‍या पत्नीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध फसवणूक, मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. वानखडे नगर येथील रहिवासी प्रीती सुरेश पवार (३0) या युवतीचा विवाह समाजाच्या परिचय पुस्तिकेतील पुणे जिल्हय़ातील भिवरी येथील रहिवासी प्रतीक गायकवाड याच्याशी २२ फेब्रुवारी २0१६ रोजी झाला होता. या विवाहानंतर प्रीती गायकवाड हिला पती प्रतीक गायकवाड, सासू प्रमिला गायकवाड, सासरे विलास गायकवाड, नणंद दिव्या गायकवाड, मावस सासू संगीता गायकवाड सर्व राहणार पुणे व अकोल्यात राहणारी मावस सासू वंदना खामकर यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. तुम्ही लग्न ऐपतीप्रमाणे लावले नाही, लग्नात काहीच व्यवस्था केली नाही, असे सांगून प्रीतीचा छळ सुरू केला. घरातील वागणूक व सासरच्यांचे सर्व कामे करीत असतानाही विनाकारण छळ करण्यात येत असल्याचे प्रीतीच्या लक्षात आले. तिने पती प्रतीक गायकवाड यांची माहिती घेण्याचे काम सुरू केले असता, त्याचे दुसरे लग्न झाले असल्याची माहिती प्रीतीला मिळाली. तिने यासंदर्भात सासरच्या मंडळींना विचारणा केली असता त्यांनी हा विवाह लपविल्याचे समोर आले, आणि पतीच्या या पहिल्या विवाहाची वाच्यता न करण्यासाठी तिचा छळ सुरू केला. मात्र, पहिल्या विवाहाचे बिंग स्वत: प्रीतीने फोडताच तिने थेट अकोला येथील आई-वडिलांचे घर गाठले. यासंदर्भात त्यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. यावरून पोलिसांनी चौकशी करून पहिला विवाह केलेला असतानाही तो लपवून दुसरा विवाह करणार्‍या पतीसह त्याला सहकार्य करणार्‍या सासरच्या मंडळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रकार अकोल्यात वाढले पुण्यातील कार्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरीवर असलेल्या व गत तीन ते चार वर्षात नव्यानेच विवाह झालेल्या अनेक  मुलांचे असे प्रताप समोर येत आहेत. पुण्यात मुलगी दिल्यानंतर मुलांचे आधीच विवाह झालेले असणे, घरच्यांच्या समाधानासाठी समाजातील मुलीशी विवाह करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे ८ ते १0 गुन्हे केवळ अकोला शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले असल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा