शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शिंदेसेनेची पहिली यादी जाहीर, बुलढाणा मधील दोनही विद्यमान आमदारांना मिळाली पुन्हा संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 06:50 IST

संजय गायकवाड, डॉ. संजय रायमुलकर यांना उमेदवारी

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील शिंदेसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री ११:३० वाजता जाहीर करण्यात आली. पश्चिम वऱ्हाडातील शिंदेसेनेचे बुलढाण्यातील दोन्ही विद्यमान आमदारांना शिंदेसेनेने पुन्हा संधी दिली आहे. बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड व मेहकरमधून डॉ. संजय रायमूलकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर भाजपने ९९ उमेदवारांची यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री ११:३० वाजता शिंदेसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. पश्चिम वऱ्हाडात बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिंदेसेनेचे दोन आमदार आहेत. या दोघांनाही विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेसेनेने पुन्हा रिंगणात उतरविले आहे. बुलढाणा मतदारसंघातून आमदार संजय गायकवाड हे दुसऱ्यांदा भाग्य आजमावणार आहेत. त्यासोबतच मेहकर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून आमदार डॉ. संजय रायमुलकर शिंदेसेनेचे उमेदवार असतील. शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीसह उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

शिंदेसेनेचे उमेदवार

मतदारसंघ    उमेदवार

कोपरी पाचपाखाडी    एकनाथ संभाजी शिंदे    मुख्यमंत्रीसाक्री (अज)    मंजूळाताई तुळशीराम गावित    विद्ममान आमदारचोपडा (अज)    चंद्रकांत बळवंत सोनावणे    आमदाराचे पतीजळगाव ग्रामीण    गुलाबराव रघुनाथ पाटील    मंत्रीएरंडोल    अमोल चिमणराव पाटील    आमदार पूत्रपाचोरा    किशोर धनसिंग पाटील     विद्ममान आमदारमुक्ताईनगर    चंद्रकांत निंबा पाटील    विद्ममान आमदारबुलढाणा    संजय रामभाऊ गायकवाड    विद्ममान आमदारमेहकर (अजा)    डॉ. संजय भास्कर रायमुलकर    विद्ममान आमदारदर्यापूर (अजा)    अभिजीत आनंदराव अडसूळ    माजी खासदार पूत्ररामटेक    आशिष नंदकिशोर जैस्वाल    विद्ममान आमदारभंडारा (अजा)    नरेंद्र भोजराज भोंडेकर    विद्ममान आमदारदिग्रस    संजय दुलीचंद राठोड    मंत्रीनांदेड उत्तर    बालाजी कल्याणकर    विद्ममान आमदारकळमनुरी    संतोष लक्ष्मणराव बांगर    विद्ममान आमदारजालना    अर्जुन पंडितराव खोतकर    माजी आमदारसिल्लोड    अब्दुल सत्तार अब्दुल नबी    मंत्रीछ. संभाजीनगर मध्य    प्रदिप शिवनारायण जैस्वाल     विद्ममान आमदारछ. संभाजीनगर प. (अजा)    संजय पांडूरंग शिरसाट    सिडको अध्यक्षपैठण    विलास संदिपान भूमरे    खासदार पूत्रवैजापूर    रमेश नानासाहेब बोरनारे    विद्ममान आमदारनांदगाव    सुहास द्वारकानाथ कांदे    विद्ममान आमदारमालेगाव बाह्य    दादाजी दगडूजी भुसे    मंत्रीओवळा माजीवडा    प्रताप बाबूराव सरनाईक    विद्ममान आमदारमागाठाणे    प्रकाश राजाराम सुर्वे    विद्ममान आमदारजोगेश्वरी (पूर्व)    मनिषा रविंद्र वायकर    खासदार पत्नीचांदिवली    दिलीप भाउसाहेब लांडे    विद्ममान आमदारकुर्ला (अजा)    मंगेश अनंत कुडाळकर    विद्ममान आमदारमाहीम    सदा शंकर सरवणकर    विद्ममान आमदारभायखळा    यामिनी यशंवत जाधव    विद्ममान आमदार    कर्जत     महेंद्र सदाशिव थोरवे    विद्ममान आमदारअलिबाग    महेंद्र हरी दळवी    विद्ममान आमदारमहाड    भरतशेठ मारूती गोगावले    अध्यक्ष, एसटी महा.उमरगा (अजा)    ज्ञानराज धोंडीराम चौगुले    विद्ममान आमदारपरांडा    डॉ. तानाजी जयवंत सावंत    मंत्रीसांगोला    शहाजी बापू राजाराम पाटील    विद्ममान आमदारकोरेगाव    महेश संभाजीराजे शिंदे    विद्ममान आमदारपाटण    शंभूराज शिवाजीराव देसाई    मंत्रीदापोली    योगेश रामदास कदम    अध्यक्ष, एमपीसीबीरत्नागिरी    उदय रविंद्र सामंत    मंत्रीराजापूर    किरण रविंद्र सामंत    मंत्री बंधूसावंतवाडी    दीपक वसंतराव केसरकर    मंत्रीराधानगरी    प्रकाश आनंदराव आबिटकर    विद्ममान आमदारकरवीर    चंद्रदीप शशिकांत नरके    माजी आमदारखानापूर    सुहास अनिल बाबर    आमदार पूत्र

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४buldhanaबुलडाणाSanjay Gaikwadसंजय गायकवाडShiv Senaशिवसेना