शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही फटाके; १० वाजतानंतरही फटाक्यांची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:41 IST

अकोला : देशातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हरित फटाक्यांचा वापर करावा तसेच दिवाळीच्या दिवशी रात्री ८ ते १० वाजतापर्यंत या दोन तासातच फटाके फोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही अकोल्यात रात्री १० वाजतानंतर फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाल्याचे दिसून आले

- सचिन राऊतअकोला : देशातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हरित फटाक्यांचा वापर करावा तसेच दिवाळीच्या दिवशी रात्री ८ ते १० वाजतापर्यंत या दोन तासातच फटाके फोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही अकोल्यात रात्री १० वाजतानंतर फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाल्याचे दिसून आले. यावरून अकोलेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही ‘फटाके’ लावल्याचे चित्र बुधवारी शहरात होते.फटाक्यांमधून निघणाऱ्या घातक धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या धुराच्या प्रदूषणाची तीव्रता भयंकर असल्याने प्रदूषणात दोन दिवसांतच झपाट्याने वाढ होते. त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून फटाके कमी प्रमाणात फोडण्याचे आवाहन करण्यासोबतच दिवाळीच्या रात्री ८ ते १० वाजतापर्यंतच फटाके फोडण्यास मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, तर हरित फटाके फोडण्यासाठी अधिक कालावधीची मुभा देण्यात आली होती; मात्र असे असतानाही अकोलेकरांनी दिवाळीच्या रात्री १० वाजतानंतरच फटाक्यांची जास्त प्रमाणात आतषबाजी केल्याचे ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या पाहणीत दिसून आले. आरोग्य विभागाची शासकीय वसाहत, पोलीस वसाहत व राजकीय पदाधिकाºयांच्या घरासमोरही रात्री उशिरा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याचेही या पाहणीत दिसून आले. पाच जणांना समजपत्रअकोल्यात रात्री १० वाजतानंतरही फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्यामुळे पोलिसांकडे काहींनी तक्रारी केल्या. यावरून सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी पाच जणांना ताब्यात घेतले. रात्री ठाण्यात ठेवल्यानंतर त्यांना समजपत्र देऊन सोडण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी कमीच!शहरासह जिल्ह्यात दरवर्षी कोटींच्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते; मात्र यावर्षी जिल्ह्यात फटाक्यांची आतषबाजी कमी प्रमाणात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकच जागृत होत असून, सोबतच सर्वोच्च न्यायालयानेही फटाके फोडण्यासाठी कालावधी निश्चित केल्याने यावर्षी फटाक्यांची आतषबाजी दरवर्षीच्या तुलनेत कमीच झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईची दिशा स्पष्ट नाही!दिवाळीच्या रात्री १० वाजतानंतर फटाके फोडण्यासाठी निर्बंध लादण्यात आले असले, तरी अकोल्यात मात्र या वेळेनंतरच अधिक फटाके फोडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने १० नंतर फटाके फोडणाºयांवर कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला; मात्र काय कारवाई करावी, हे स्पष्ट नसल्यामुळे पोलिसांनाही कारवाई करताना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पोलिसांनी समजपत्र देऊन सोडल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrackers Banफटाके बंदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय