शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्री रुग्णालयात ‘फायर मॉक ड्रिल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 10:57 IST

Lady Harding Hospital रविवारी जिल्हा स्री रुग्णालयात फायर मॉक ड्रिल करण्यात आले.

ठळक मुद्देफायर फायटिंग ॲण्ड डिटक्शन सिस्टीम कार्यान्वित नाही. यावेळी ७०पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

अकोला : अग्निशमन यंत्रणा असली तरी त्याचा वापर कर्मचाऱ्यांना करता यावा, या उद्देशाने रविवारी (दि.१०) जिल्हा स्री रुग्णालयात फायर मॉक ड्रिल करण्यात आले. यावेळी जवळपास ७०पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले. भंडारा येथील घटनेनंतर हे प्रशिक्षण घेण्यात आले हे विशेष. जिल्हा स्री रुग्णालयाचे इलेक्ट्रिकल फायर ऑडिट झाले असले तरी फायर फायटिंग ॲण्ड डिटक्शन सिस्टीम कार्यान्वित नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेची मदार अग्निशमन सिलिंडरवर आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात आग लागल्यास उपलब्ध साधनांचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे या अनुषंगाने रविवारी जिल्हा स्री रुग्णालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना फायर मॉक ड्रिलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ७०पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनासाठी मनपा अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मॉक ड्रिलदरम्यान अग्निशमन विभागाची गाडी बोलावण्यात आली होती.

असे झाले मॉक ड्रिल

  • रुग्णालयातील अग्निशामक सीओ-२, एबीसी आणि ड्राय पावडर सिलिंडरविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राथमिक माहिती देण्यात आली.
  • त्याचा वापर कसा करावा या संदर्भात प्रत्यक्ष प्रात्याक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
  • त्यानंतर रुग्णालयातील मुख्य स्वीच कुठे आहे आणि आग लागल्यास त्यातील कोणते स्वीच बंद करावे याचे प्रात्याक्षिक देण्यात आले.
  • नव्या इमारतीमधील सिक्युरिटी अलार्म कसा कार्य करतो, याविषयीदेखील मार्गदर्शन करण्यात आले.
  • दर सहा महिन्यात एकदा फायर मॉक ड्रिल

जिल्हा स्री रुग्णालयात दर सहा महिन्यातून एकदा फायर मॉक ड्रिल करण्यात येते. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हा स्री रुग्णालयात फायर मॉक ड्रिल घेण्यात आले. दरवर्षी रुग्णालय स्तरावरच या प्रकारचे फायर मॉक ड्रिल केले जाते, मात्र यंदा पहिल्यांदाच मॉक ड्रिलसाठी रुग्णालयातील सर्वच डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी असे एकूण ७० जणांना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यात आले.

 

भंडारा येथील घटना भयावह आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्रणेचा उपयोग करता यावा, या उद्देशाने रविवारी खबरदारी म्हणून फायर मॉक ड्रिल घेण्यात आली. दर सहा महिन्यातून एकदा रुग्णालयस्तरावर फायर मॉक ड्रिल केली जाते.

- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्री रुग्णालय

टॅग्स :Lady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालयAkolaअकोलाfireआग