शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्यासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्याविरुद्ध फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 12:45 IST

अकोला: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन परवाना मिळविण्यासाठी शाळेचे बनावट कागदपत्र सादर करून परवाना प्राप्त करणाºया चोहोट्टा बाजार येथील युवकाविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन परवाना मिळविण्यासाठी शाळेचे बनावट कागदपत्र सादर करून परवाना प्राप्त करणाºया चोहोट्टा बाजार येथील युवकाविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सदर युवकाचा वाहन परवानाही रद्द करण्यात आला आहे.वाशिम बायपासवरील साई मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चोहोट्टा बाजार येथील रहिवासी शेख अनिस शेख अकील (२६) याने जड वाहन शिकण्यासाठी व वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रवेश घेतला होता. यासाठी ड्रायव्हिंग स्कूलतर्फे त्याच्या वाहन परवान्यासाठी १३ आॅगस्ट २०१८ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यात आली. या कागदपत्रांमध्ये त्याने संत गाडगेबाबा विद्यालय, येसुर्णा, अचलपूरच्या शाळेची शाळा सोडल्याचा दाखला व इतर कागदपत्रे जोडली होती. उपप्रादेशिक परिवहन विभागाने ही कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत शेख अनिस याला कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना दिला होता. कागदपत्रे तपासणीत संत गाडगेबाबा विद्यालय हे इयत्ता ८ वी ते १० वीपर्यंतच असल्याचे समोर आले. सोबतच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेला क्रमांक शाळेच्या रेकॉर्डवर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. टीसीत उल्लेख केला आहे की शाळेत इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतला; मात्र तपासणीनंतर बनावट कागदपत्र असल्याचे लक्षात येताच उपप्रादेशिक परिवहन विभागाने शेख अनिस शेख शकील याचा परवाना रद्द करून कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी मोटर वाहन निरीक्षक भाग्यश्री पाटील यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी सदर युवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी