शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

अकाेला जिल्ह्यात ५० लाखांच्यावर दंड थकीत, पाेलिसांनी पाठविल्या नाेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 11:22 IST

Fined over Rs 50 lakh pendings : वाहतूक शाखेने केलेल्या कारवायानंतर तब्बल ५० लाख रुपयांचा दंड अजूनही थकीत असल्याची माहिती समाेर आली आहे़

अकाेला : वाहतूक नियम ताेडल्यानंतर २०१९ पूर्वी वाहनचालकाला जागेवरच दंड भरावा लागत हाेता़. मात्र २०१९ पासून इ चालान ही पद्धती वाहतूक शाखेत कार्यान्वित करण्यात आली असून वाहन चालकाला दंड झाल्यानंतर ताे कुठेही आणि केव्हाही दंड भरू शकताे. तसेच दंडाची रक्कम न भरता ताे हा दंड वर्षानुवर्ष थकीतही ठेवत असल्याचे आता समाेर आले असून, अकाेला वाहतूक शाखेने केलेल्या कारवायानंतर तब्बल ५० लाख रुपयांचा दंड अजूनही थकीत असल्याची माहिती समाेर आली आहे़. अकाेला वाहतूक शाखेने २०२१ या सहा महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कारवाया केलेल्या आहेत़. तब्बल ६० हजार ३१८ कारवाया करून वाहतूक शाखेने तब्बल ४१ लाख रुपयांचा दंड वसूल केलेला आहे़. तर सुमारे ५० लाख रुपयांचा दंड ३० हजारांपेक्षा अधिक वाहन चालकांकडे थकीत असून ताे वसूल करण्यासाठी आता वाहतूक शाखेने वाहन चालकांच्या घरी लेखी नाेटीस पाठविलेल्या आहेत़.

 

 

सर्वाधिक दंड माेबाइलचा वापर करणाऱ्यांना

अति वेगात वाहने चालविणे धाेकादायक आहे़ असे वाहनचालक स्वत:सह दुसऱ्यांचाही जीव धाेक्यात घालतात़ सर्वात जास्त कारवाया या अति वेगात वाहन चालविताना माेबाइलचा वापर करणाऱ्यांवर झालेल्या आहेत़. तब्बल दाेन हजार ५५१ वाहनचालकांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत़.

 

दंड थकीत ठेवला तर कारवाई निश्चित

दंड आकारल्यानंतर अनेकजण ताे दंड भरत नसल्याचे वास्तव आहे़ मात्र दंड थकीत ठेवला तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्या वाहनाचे नूतनीकरण हाेत नाही़. वाहन चालकाचा परवाना देण्यात येत नाही़ तसेच ते वाहन दुसऱ्या काेणत्या शहरात पकडल्या गेले तर आधीचा दंड वसूल झाल्याशिवाय नवीन दंड आकारण्यात येत नाही व पर्यायाने ते वाहन जमा करण्यात येते़. त्यामुळे थकीत दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आतमध्ये भरणे आवश्यक आहे़.

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस