शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

खरिपाच्या पेरणीसाठी आर्थिक बजेट कोलमडले

By admin | Updated: June 1, 2017 01:36 IST

बँकांनी हात आखडले; शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : सध्या खरीप हंगामाची तयारी शेतकरी करीत असून, शेती मशागतीसह बियाणे, खते विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे; मात्र बँकांनी हात आखडता घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तेल्हारा तालुक्यातील जनतेचे आर्थिक व्यवहार करण्याचे मुख्य शहर म्हणजे तेल्हारा. तालुक्यातील दहीगाव, माळेगाव, हिवरखेड, भांबेरी, तळेगाव बाजार या मोठ्या गावांसह लहान ग्रामीण भागातून नागरिकांची दैनंदिन कामे करण्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी धाव घेतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे बँक. कारण गेल्या सहा महिन्यांपासून जनतेने आपल्या भविष्यातील कामकाजाचा आधीच आढावा घेऊन गुंतवणूक करून ठेवलेले पैसे पूर्णपणे मिळत नसल्याने त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कारण ९/११ च्या नोटाबंदीनंतर प्रचंड प्रमाणात पैशांचा तुटवडा पडल्याने बँक आणि खातेदार यांच्यात तणाव निर्माण होत आहेत. लग्न, वस्तू खरेदी याकरिता लागणारा पैसा हा एकरकमी मिळत नसल्याने रोज थोडे थोडे पैसे काढून स्वत:च्या घरीच पैसे जमा करण्यावर नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. त्यामुळे जुन्या काळातील लोकांना घरी पैसा जमा करण्याची जुनी पद्धत पुढे येत असल्याची आठवण होत आहे. लवकरच मृग नक्षत्राचे आगमन होत असून, शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. कारण बागायती शेतकरी १ जूनपासूनच कपाशीची लागवण करीत असल्याने त्याकरिता लागणारे बियाणे विकत आणणे गरजेचे आहे. त्यातही नामांकित असलेल्या पऱ्हाटीच्या कंपनीचे बियाणे उधारीवर मिळत नसल्याने नगदी घ्यावे लागेल. ते प्रचंड महाग असल्याने व त्यातही बँकांमधून केवळ २ ते ४ हजार रुपये मिळत असल्याने त्याचा समन्वय साधणे कठीण जात आहे. ज्या बँकांमध्ये आपले पैसे आहेत, त्या घरातील एक व्यक्ती रोज तेल्हारा येथील बँकांमध्ये पैसे काढण्याकरिता येत आहेत. त्यामुळे बँकांच्या व्यवहारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. पेरणीचे दिवस अगदी जवळ आले असून, बियाणे, खत, पेरणी, मजुरांची मजुरी तसेच दैनंदिन गरजा भागविण्याकरिता स्वकष्टाच्या कमाईतून कमावलेला पैसा बँकेत न ठेवता व वेळेवर पूर्ण पैसे मिळत नसल्याने घरीच पैसे जमा करून ठेवण्यावर जनतेचा कल असल्याचे दिसून येत आहे. दैनिक अल्पबचत ठेवीच्या माध्यमातून रोज मिळणाऱ्या दीडशे रुपये मजुरीमधील ५० रुपये गुंतवणूक करणे गरजेचे होते; परंतु बँकेमधून पूर्ण पैसे मिळणार की नाही मिळणार, त्यापेक्षा घरीच पैसे जमा केलेले बरे.- गजानन न. मोडोकार,शेतमजूर, रायखेड.पेरणीचे दिवस जवळ आले असून, कपाशीचे बियाणे, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन यांच्या खरेदीकरिता लागणारा पैसा कसा गोळा करायचा.- उमेश व. धरमकर,शेतकरी, दहीगाव अवताडे.