शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 16:26 IST

अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला.

ठळक मुद्देस्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. मोर्णा काठी घाट निर्मिती, बगीचा, शोष खडडे या कामांसाठी या निधीचा विनीयोग केला जाणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही मोर्णाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. मंगळवारी नियोजन सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी या कर्मचाऱ्यां नी धनादेश दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व अन्य मान्यवर उपस्थित होते. मोर्णा काठी घाट निर्मिती, बगीचा, शोष खडडे या कामांसाठी या निधीचा विनीयोग केला जाणार आहे.जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक विजय खेडकर, सहायक प्रमोद ठाकूर, वाहनचालक किशोर तायडे, डिगांबर ठग, सुरक्षा रक्षक सिध्दु जंजाळ, प्रवीण शिरसाट, नारायण देवळे, महिला पोलीस संध्या अरखराव, सेवक मधुकर कुमरे, जी.पी. भारती, निलेश गाडगे, साऊंड रेकोर्डिस्ट रोहीत जांभे या कर्मचाºयांनी मोर्णा स्वच्छता मिशनसाठी निधी दिला आहे.जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला १३ जानेवारीपासून प्रारंभ झाला. लोकसहभागातून ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ करण्यास यश मिळाले आहे. मोर्णाच्या स्वच्छतेबरोबरच जिल्हा प्रशासनाने मोणार्चा विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कामासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान देण्याचा निश्चय केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक यांनी मोर्णाच्या विकासासाठी निधी दिल्याने नदीकाठी विविध विकास कामांना गती आली आहे. नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातही मोर्णाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीम